शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : प्लॅटफॉर्मवरून खाली पडताच समोरून आली ट्रेन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 13:19 IST

एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहताना दिसत आहे.

यूएसमधील कॅलिफोर्नियातील कोलिजियम स्टेशनमध्ये एक मोठी घटना घडली. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहताना दिसत आहे. स्टेशनवर ट्रेन येते. तेवढ्यात व्यक्ती प्लॅटफॉर्मवरनू ट्रेनच्या रूळावर पडतो आणि मदतीसाठी ओरडतो. तेवढ्यात एका एरिया रॅपिड ट्रांजिट (BART) कर्मचाऱ्याने आपल्या जिवावर खेळून व्यक्तीचा जीव वाचवला. ही घटना रविवारी घडली असून लोक ऑकलॅन्ड रायडर गेम पाहून आपापल्या घरी जात होते. स्टेशनवरील सीसीटिव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. 

पाहा सदर घटनेचा व्हिडीओ : 

स्टेशनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं नाव जॉन ओ'कॉनर आहे आणि तो संध्याकाळी स्टेशनवरील गर्दी नियंत्रिणात ठेवण्यासाठी स्टेशनवर काम करत होता. कर्मचारी प्लॅटफॉर्मवरून खाली पडलेल्या व्यक्तीच्या जवळ उभा होता. जशी ती व्यक्ती खाली पडली, कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून त्या व्यक्तीला लगेच मदतीचा हात पुढे केला आणि त्याचा जीव वाचवला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ सॅन फ्रान्सिस्को बे एरिया ट्रान्जिटने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, 'आमचा हिरो जॉन ओ'कॉनरने रविवारी रात्री कोलिजियम स्टेशनवर एका व्यक्तीचा जीव वाचवला. जॉन एक परिवहन पर्यवेक्षक आहे आणि त्यांनी 20 पेक्षा जास्त वर्षांसाठी  BART मध्ये काम केलं आहे. त्यांनी प्रसंगावधाना राखून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.'

घटना घडत असताना टोनी बदीला नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्या प्रवाशाचा जीव कर्मचाऱ्याने वाचवला होता. तो कर्मचाऱ्याचे आभार मानत होता. 

BARTने सीएनएनशी बोलताना सांगितले की, जेव्हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर पडली त्यावेळी नशेत होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोक कर्मचाऱ्याचं कौतुक करत आहेत. एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'हा खरा सुपरहिरो आहे. प्रत्येकामध्ये अशीच माणुसकी असणं गरजेचं आहे.'

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय