सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: रामनगरहून उधमपूरला जाणारी एक ओव्हरलोड बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. बस इतक्या वेगाने खाली कोसळली की तिचे छत पूर्णपणे उडाले आणि कोसळताना तिने एका रिक्षाचा अक्षरशः चुराडा केला.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रामनगर भागातील कागोट गावाजवळील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी तिथून जाणाऱ्या लष्कराच्या एका ताफ्याने तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक आणि पोलिसांनीही मदतीसाठी धाव घेतली.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
अपघातातील गंभीर जखमींना हवाईमार्गे रुग्णालयांत नेले गेले. मृतांत महिला व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसदारांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली गेली आहे.
Web Summary : An overloaded bus plunged 100 meters into a gorge near Ramnagar, Jammu, killing 21 and injuring 51. The bus crashed after the driver lost control, destroying a rickshaw. Rescue operations were launched by the army and local police. The President and Prime Minister expressed grief and announced compensation.
Web Summary : जम्मू के रामनगर में एक ओवरलोड बस 100 मीटर गहरी खाई में गिर गई, जिससे 21 लोगों की मौत हो गई और 51 घायल हो गए। चालक के नियंत्रण खो देने से बस दुर्घटनाग्रस्त हो गई और एक रिक्शा नष्ट हो गया। सेना और स्थानीय पुलिस ने बचाव अभियान शुरू किया। राष्ट्रपति और प्रधानमंत्री ने शोक व्यक्त किया और मुआवजे की घोषणा की।