काय सांगता! कॅनडात लाकूडतोड्या एका तासात करतो छप्परफाड कमाई, आकडा वाचाल तर नक्कीच येईल चक्कर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:01 IST2026-05-19T15:57:16+5:302026-05-19T16:01:04+5:30
Canada Viral Video : कॅनडात डिग्रीपेक्षा आपल्याकडे असलेलं कौशल्य किती काही वेळात किती कमाई करून देतं याचं उदाहरण असलेला हा व्हिडीओ आहे.

काय सांगता! कॅनडात लाकूडतोड्या एका तासात करतो छप्परफाड कमाई, आकडा वाचाल तर नक्कीच येईल चक्कर...
Canada Viral Video : सोशल मीडियावर आपण पाहत असतो की, वेगवेगळ्या देशांमध्ये नोकरी करणाऱ्यांना किती पगार मिळतो, नर्सना किती पगार मिळतो किंवा वेगवेगळ्या रोजंदारीच्या कामासाठी किती पैसे मिळतात हे दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कशाप्रकारे कमी मेहनत घेऊन आणि मोठ्या शहरांमध्ये राहून काही लोक कसे पैसे कमावतात हे या व्हिडीओंमधून दाखवलं जातं. सध्या कॅनडातील एक असाच व्हिडीओ चर्चेत आलाय. ज्यात दाखवण्यात आलंय की, एक व्यक्ती म्हणजे लाकूडतोड्या झाडं तोडून एका तासात किती पैसे कमावतो. या व्यक्तीने जी काही कमाई केली ती बघून आपणही नक्कीच चक्रावून जाल.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. ज्यात दाखवलं आहे की, एक व्यक्ती कॅनडामध्ये झाडं तोडण्यासाठी आली आहे. या व्हिडिओत सांगण्यात आलंय की, जर आपल्याकडे योग्य कौशल्य असेल आणि आवश्यक साहित्य असेल तक ब्लू कॉलर जॉबमधूनही आपण चांगली कमाई करू शकता. या झाडं तोडणाऱ्या व्यक्तीने एका तासात ७०० डॉलर इतकी कमाई केली. भारतीय करन्सीनुसार ७०० डॉलरमध्ये साधारण ५८ हजार रूपये इतके होतात.
व्हिडिओत विशाल सांगतो की, कॅनडात पैसा नाही असं कोण म्हणतं. या व्यक्तीने केवळ एका तासात माझ्याकडून ७०० डॉलर कमावले. तेही फक्त झाडाच्या फांद्या तोडून. मी असं म्हणत नाही की, हे काम सोपं आहे. ही व्यक्ती उन्हाळ्यातही रोज बुक असते आणि हिवाळ्यात तो बर्फ साफ करण्याचं काम करतो.
तो पुढे सांगतोय की, हे काम मेहनतीचं तर आहेच, सोबतच कौशल्याचं आहे आणि अनुभवाचं देखील आहे. यासाठी बरंच साहित्य लागतं. जर आपल्याला हे काम येत असेल तर चांगली कमाई करू शकता. लोकांना वाटतं की, कॅनडात पैसे कमावणं अवघड आहे. पण इथे तर गवत कापणारे, बर्फ साफ करणारे आणि झाडं कापणारेही चांगली कमाई करत आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. अनेकांनी लिहिलं की, कॅनडासारख्या देशांमध्ये डिग्रीपेक्षा कौशल्याला जास्त महत्व असतं. एका यूजरने लिहिलं की, हेच कॅनडाचं सत्य आहे. अनेक क्षेत्रात डिग्रीपेक्षा कौशल्य जास्त वरचढ ठरतं.