'बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न करायचे आहे, मला नोकरी द्या'; तरुणाचा अर्ज पाहून CEO हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:27 IST2024-06-15T14:20:50+5:302024-06-15T14:27:33+5:30

सध्या जगभरात तरुणाईच्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आहे.

viral job application of a technical manager post in bengluru job seeker cv viral on social media | 'बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न करायचे आहे, मला नोकरी द्या'; तरुणाचा अर्ज पाहून CEO हैराण

'बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न करायचे आहे, मला नोकरी द्या'; तरुणाचा अर्ज पाहून CEO हैराण

Social Viral : सध्या जगभरात तरुणाईच्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनाचा रहाटगाडा सुरळीत चालू राहावा यासाठी धडपड करावी लागते. जगण्यासाठी पैसा पाहिजे आणि  पैसा मिळवण्यासाठी नोकरी असणं गरजेचं आहे. पाहायला गेल्यास बेरोजगारीच्या समस्येने जगभरातील युवक त्रस्त आहेत. उच्च शिक्षित, पदवीधर असूनही बरेच जण घरी बसून आहेत. एकंदरीत यावरून अंदाज येतो की नोकरी न मिळण्याची समस्या दिवसेंदिवस किती वाढत चालली आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका तरुणाने केलेला नोकरीचा अर्ज चर्चेचा विषय बनला आहे.

माझ्या मुलीशी लग्न करायचे असेल तर आधी कमाव. नोकरी कर. तोपर्यंत माझ्या मुलीशी लग्नाचा विचारही करू नको, असे आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहतो. खऱ्या आयुष्यातही असेच एक प्रकरण समोर आले आहे. नोकरीचा अर्ज करताना एका उमेदवाराने कंपनीला त्याला नोकरी देण्याची विनंती केली. तुम्ही नोकरी दिल्यास मला माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीशी लग्न करता येईल, असे त्याने अर्जात म्हटले आहे. कंपनीच्या सीईओने हा अर्ज सोशल मीडियावर शेअर केला असून, तो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल नोकरीचा अर्ज टेक्निकल मॅनेजरच्या पोस्टसाठी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका कंपनीने नोकरीसाठी जाहिरात दिली होती. कंपनीला इंजिनिअरची गरज होती. त्यासाठी कंपनीतील रिक्त उमेदवारने त्याच्या सीव्हीमध्ये असं काही लिहलं, जे वाचून चक्क कंपनीचा सीईओ हैराण झाल्याचं चित्र आहे. 

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या अर्जामध्ये या उमेदवाराने लिहिले की, "मला वाटते की या पदासाठी आवश्यक असलेली क्षमता माझ्याकडे आहे आणि मी ती पूर्ण करतो. जर मला ही नोकरी मिळाली नाही तर मी माझ्या बालपणीच्या प्रेमाशी कधीच लग्न करू शकणार नाही. माझ्याकडे नोकरी असेल तेव्हाच मी तिच्याशी लग्न करू शकेन, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे". या अर्जावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. 

Web Title: viral job application of a technical manager post in bengluru job seeker cv viral on social media