शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या गर्दीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील विठ्ठलवाडी भाजी बाजारात रविवार आणि गौरी-गणपतीच्या सणामुळे मोठी गर्दी जमली होती. याच संधीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मोबाईल पडला की चोरीला गेला याचीही भनक त्यांनी अनेकांना लागू दिली नाही. शहर पोलिसांकडे मोबाईल हरविला व चोरीच्या चार तक्रारी रविवारी दाखल झाल्या. गौरीच्या सणानिमित्त प्रत्येकाच्याच घरी जेवणावळी असतात. महाप्रसादासाठी तसेच नैवैद्याकरिता विविध प्रकारच्या भाज्यांची खरेदी केली जाते. भाजी बाजारात कधी नव्हे ती त्यामुळे गर्दी झाली. त्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी टपलेल्या मोबाईल चोरांनी हात साफ केले. अनेकांना आपला मोबाईल चुकून गहाळ झाला असेच वाटायला लागले. तर काहींना मोबाईल चोरी गेल्याची शंका आली. पहाटेच सण-उत्सवाच्या काळात गडबडीत असलेल्या अनेकांनी पोलीस ठाणे गाठणे टाळले. मात्र याही धावपळीत काहींनी कर्तव्य समजून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संतोष कळसकर रा. कृषीनगर यांनी त्यांचा १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. याप्रमाणे अरुण महल्ले, गजानन सरोदे, केतन भवरे यांचेही मोबाईल गायब झाले. चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हात चलाखीने मोठ्या प्रमाणात मोबाईल लंपास केले. सध्या सणा-सुदीचे दिवस असून गर्दीमध्ये रोख रक्कम उडविणारी टोळी सक्रीय असते. यासोबतच मोबाईलवर ही हात मारला जातो. मागील काही दिवसात या टोळ्या शांत होत्या. आता पुन्हा त्यांनी आपले डोके वर काढले असून बाजारातील गर्दी व घाईगडबडीचा फायदा घेतला जात आहे. मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ व चोरीच्या तक्रारी येत आहे. अनेकांनी तर तक्रार देण्याचेही टाळले आहे. हा सणासुदीच्या काळातील चोरट्यांचा उपद्रव पोलिसांसाठी आव्हान देणारा आहे. काही मिनिटात मोबाईल स्वीच ऑफ- घाईगडबीत खिशातून पडलेला मोबाईल काही मिनिटात स्वीच ऑफ होणे शक्य नाही. गर्दीत चुकून आपला मोबाईल पडला असावा असा समज झाला. मात्र सुरू असलेला मोबाईल अचानक बंद कसा पडला यावरून संशय निर्माण झाला. एकाच वेळी अनेक जण मोबाईल नसल्याची तक्रार करू लागले. यावरून भाजीबाजारात चोरट्यांनी मोबाईल लंपास केल्याचे उघड झाले आहे. आता यात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले.

 

टॅग्स :ThiefचोरMobileमोबाइल