PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:39 IST2026-04-19T12:38:45+5:302026-04-19T12:39:53+5:30

BJP Maithili Thakur Trolled: मैथिली ठाकूरने फोटो पोस्ट करताना एक मोठी चूक केली

PM Modi speech on women reservation and photo in the car Youngest bjp MLA Maithili Thakur trolled over timing | PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...

PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...

BJP Maithili Thakur Trolled: प्रसिद्ध गायिका आणि भाजपची युवा आमदार मैथिली ठाकूर सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि महिला आरक्षण विधेयकावरून शनिवारी रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित केले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असलेल्या मैथिलीने मोदी यांच्या भाषणाचे कौतुक करणारी पोस्ट केली. मात्र या पोस्टच्या 'टायमिंग'मुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

मैथिली ठाकूरने आपल्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले की, "बंगालमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान रस्त्यावरून प्रवास करताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा महिलांच्या नावे असलेला संदेश ऐकला. नारी सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाचा प्रस्ताव संसदेत मंजूर होऊ शकला नाही, हे पाहून मन दुखावले. मात्र, महिलांचा आवाज आणखी बुलंद होतच राहील, कारण सन्मान आणि सुरक्षा हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे." तिच्या या पोस्टवर राजकीय मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. पण तिच्या फोटोवरून एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला.

मैथिलीच्या फोटोवरून निर्माण झाला संशय

मैथिलीच्या या पोस्टनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोशन राय याने तिच्यावर गंभीर आरोप केले. राय यांनी मैथिलीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत तिला 'फ्रॉड' म्हटले. त्यांच्या दाव्यानुसार, पंतप्रधान मोदींनी ते भाषण रात्री ८:०० वाजता दिले होते, तर मैथिलीने त्या भाषणावर आधारित आपली प्रतिक्रिया अवघ्या ३८ मिनिटांत म्हणजेच रात्री ८:३८ वाजता पोस्ट केली. पण खिडकीबाहेरील दृश्य बघा." रोशन राय यांनी मैथिलीच्या पोस्टमधील फोटोकडे लक्ष वेधले आहे. मैथिलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या गाडीच्या खिडकीबाहेर लख्ख सूर्यप्रकाश दिसत आहे. रात्री ८:३० वाजता बाहेर इतका उजेड असणे अशक्य असल्याने, ही पोस्ट आधीच लिहून ठेवलेली (Scripted) होती का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावर 'पेड प्रमोशन' आणि 'राजकीय प्रचारा'बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण मैथिली ठाकूरने अद्याप या वादावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title : पीएम मोदी का भाषण और कार फोटो: मैथिली ठाकुर ट्रोल

Web Summary : भाजपा की मैथिली ठाकुर महिलाओं की सुरक्षा पर पीएम मोदी के भाषण की प्रशंसा करने वाली पोस्ट के लिए ट्रोल हुईं। आलोचकों ने समय और एक तस्वीर पर सवाल उठाया, जिससे पता चलता है कि यह पहले से ही लिखी गई थी।

Web Title : PM Modi's Speech and Car Photo: Maithili Thakur Trolled

Web Summary : BJP's Maithili Thakur faces trolling for a post praising PM Modi's speech on women's safety. Critics question the timing and a photo suggesting it was pre-scripted due to daylight, sparking debate on political promotions.