बोंबला! स्विचबोर्डमध्ये डोकं घालत होती मांजर, पुढे जे झालं ते बघाच.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 12:37 IST2019-08-09T12:36:49+5:302019-08-09T12:37:58+5:30

सोशल मीडियात मांजरींचे चांगले-चांगले क्यूट फोटो तुम्ही नेहमीच बघत असता. पण मांजरीचे असे फोटो पहिल्यांदाच बघाल.

Pictures of a cat exploring switchboard goes viral on social media | बोंबला! स्विचबोर्डमध्ये डोकं घालत होती मांजर, पुढे जे झालं ते बघाच.....

बोंबला! स्विचबोर्डमध्ये डोकं घालत होती मांजर, पुढे जे झालं ते बघाच.....

सोशल मीडियात मांजरींचे चांगले-चांगले क्यूट फोटो तुम्ही नेहमीच बघत असता. मांजरी कशा सतत सगळीकडे लुडबूड करणाऱ्या असतात हे आपणा सर्वांना चांगलंच माहीत आहे. मात्र, एका मांजरीला तिचं हे लुडबूड करणं चांगलंच महागात पडलंय. ट्विटरवर @owurakuwaa नावाच्या यूजरने त्याच्या मांजरीचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून ट्विटरकरांचं हसूच आवरत नाहीये.

मांजर कधीच शांत बसत नाही. त्या घरभर फिरून इकडे-तिकडे डोकं घालत असतात. कुणी चालत असेल तर पायांच्या मधे मधे येतात. @owurakuwaa ची मांजर असंच कुठेतरी डोकं घालत होती. झालं असं की, घरातील एक स्विच बोर्ड उघडलेला होता. झालं, मांजरीचं त्यात डोकं घालून बघणं सुरू झालं. पण हेच तिला महागात पडलं.

@owurakuwaa ने हे फोटो शेअर करताना लिहिले की, 'गेल्या रात्री क्यूरिओसिटीने मांजरीचा जवळपास जीवच घेतला होता'. मांजरीने इलेक्ट्रिसिटी सॉकेटमध्ये मुंडकं घातलं आणि तिला जोरदार शॉक लागला. शॉक लागल्यानंतर या मांजरीचा चेहरा बघण्यासारखा झाला.

आता हे फोटो पाहून लोकांना हसू आवरणं कठीण झालं आहे. तर दुसरीकडे काही यूजर्सना मांजरीसोबत जे झालं त्याचं वाईटही वाटत आहे. तर एका यूजरने मांजरीची तुलना एलबर्ट आइंस्टाइनसोबत केली आहे. 

Web Title: Pictures of a cat exploring switchboard goes viral on social media