शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:43 IST

Australian Skydiver Parachute Viral Video: त्याने उडी घेतली तेव्हा विमान १५,००० फुटांवर होते

Australian Skydiver Parachute Viral Video: सोशल मीडियावर चित्तथरारक व्हिडीओ व्हायरल होणे हे नवीन नाही. स्कायडायव्हिंग हा एक साहसी क्रीडाप्रकार आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. या व्हिडीओंमधून अनेकांना प्रेरणा मिळते. पण काही व्हिडीओ असे असतात ज्याने काळजाचा ठोका चुकतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात १५,००० फूट उंचीवरून उडी घेतल्यानंतर एका ऑस्ट्रेलियन स्कायडायव्हरचा पॅराशूट विमानालाच अडकला. क्वीन्सलँडमधील मिशन बीच येथे ही थरारक घटना घडली, ज्याचे नाट्यमय फुटेज ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो (ATSB) ने जारी केले.

नेमके काय घडले?

‘बिग वेज ॲट द बीच’ या कार्यक्रमादरम्यान, स्कायडायव्हरने १६-वे फॉर्मेशन जम्पसाठी सेसना कारवाँ (Cessna Caravan) विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. विमानाचा रोलर दरवाजा उघडताच, बाहेर पडणाऱ्या पहिल्या स्कायडायव्हरच्या रिझर्व्ह पॅराशूटचे हँडल विमानाला असलेल्या विंग फ्लॅपमध्ये अडकले. यामुळे पॅराशूट तात्काळ उघडले गेले आणि स्कायडायव्हर विमानाबाहेर लटकला. तो विमानाचे पंख आणि मागची बाजू या भागाजवळ अडकला. सुमारे १५,००० फूट उंचीवर हा प्रकार घडत होता. त्यामुळे साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. ही संपूर्ण घटना स्कायडायव्हरच्या हेल्मेट कॅमेरात आणि विमानावर लावलेल्या दुसऱ्या कॅमेरात कैद झाली.

स्कायडायव्हर कसा वाचला?

प्रसंगावधान राखत स्कायडायव्हरने त्वरित अपेक्षित कृती केली. त्याने सोबत असलेल्या 'हुक नाइफ' (Hook Knife) चा वापर करून पॅराशूटच्या दोऱ्या कापल्या आणि स्वतःला विमानापासून मुक्त केले. दोऱ्या कापल्यानंतर तो मुक्तपणे खाली पडू लागला (Freefall). पण काही क्षणातच, त्याने यशस्वीरित्या आपले दुसरे मुख्य पॅराशूट उघडले आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरला. या जीवघेण्या दुर्घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली, पण सुदैवाने त्याचा जीव मात्र वाचला.

ATSB च्या अहवालानुसार, हा स्कायडायव्हरचा एक 'narrow escape' होता. या घटनेमुळे स्कायडाईव्हिंग दरम्यान सुरक्षितता प्रक्रियेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन पॅराशूट फेडरेशन (APF) आता अशा प्रकारच्या परिस्थितीत 'लोड मास्टर्स'ची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Skydiving scare: Parachute tangles mid-air, Aussie skydiver survives dramatic fall.

Web Summary : An Australian skydiver's parachute got caught on the plane after jumping from 15,000 feet. He used a hook knife to cut the lines and deployed his reserve parachute, landing safely with minor injuries. The incident highlights skydiving safety protocols.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलAustraliaआॅस्ट्रेलिया