ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 12:41 PM2021-03-11T12:41:58+5:302021-03-11T12:55:42+5:30

Trending Viral News in marathi : उल्कापिंडाच्या (meteorite) चाचणीदरम्यान वैज्ञानिक चकीत झाले. कारण या उल्कापिंडाच्या माध्यमातून पृथ्वीच्या जीवनाबाबत अधिक माहिती मिळाली.  

Meteorite dropped from the sky in britain is extremely rare it will show the history of life on earth | ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ 

ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ 

Next

२८ फेब्रुवारीला ब्रिटन आणि उत्तर युरोपात आकाशातून अचानक काही जळणारे गोळे पडले होते. त्यानंतर वैज्ञानिकांच्या मनातही  हे गोळे कशाचे असावेत याची जिज्ञासा होती.  काहीतरी अघटीत होणार आहे अशी  शंका वैज्ञानिकांना होती. उल्कापिंडाच्या (meteorite) चाचणीदरम्यान वैज्ञानिक  चकीत झाले. कारण या उल्कापिंडाच्या माध्यमातून पृथ्वीच्या जीवनाबाबत अधिक माहिती मिळाली.  

ब्रिटेन के कॉटस्वोल्डमध्ये (small Cotswold town of Winchcombe) रस्त्याच्या किनारी आकाशातून काही उल्कापिंड पडले. खरं पाहता आकाशात उल्कापिंड पडणं यात काही नवीन नाही. पण यावेळी निसर्गातून काही वेगळंच बाहेर येईल. याची वैज्ञानिकांना कल्पनाही नव्हती. या तपासणीदरम्यान या उल्कापिंडात अनेक रहस्यमय गोष्टी समोर आल्या. असं मानलं जात आहे की, या उल्कापिंडानं पृथ्वीच्या सुरूवातीच्या इतिहासासह पृथ्वी वर जीवन कसे सुरू झाले, या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. 

ब्रिटनमध्ये आकाशातून पडलेला उल्कापिंड ३०० ग्रमचा आहे. वैज्ञानिकांनी ब्रिटनच्या ग्लूस्टरशायरनं हा उल्कापिंड शोधण्यात यश मिळवलं आहे. आकाशातून पडलेला हा तुकडा कार्बोनेसस कॉनड्राइट (carbonaceous chondrite) ने तयार झालेला आहे. हा तुकडा आकाशात पृथ्वीवरच्या प्राचीन पदार्थांपासून तयार झाल्याचं मानलं जात आहे. काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

या दगडाच्या तुकड्यात  वैज्ञानिकांना कार्बनिक पदार्थ आणि अमिनो एसिड्स सुद्धा मिळाले.  जे पाहून वैज्ञानिकांची झोप उडाली, कारण असे अमिनो एसिड्स आणि कार्बनिक पदार्थ माणसांच्या शरीरात दिसून येतात. असं मानलं जात आहे की, माणसाच्या जीवन बनवण्यासाठी ही रसायनं महत्वाची असते. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री ऑफ म्यूझियमनं (Natural History Museum)  दिलेल्या माहितीनुसार आकाशातून पडल्यानंतरही या दगडाच्या गुणवत्तेवर काहीही परिणाम झालेला नाही.  हा दगड गुणवत्तेसह आकाशातून पडला  ही आश्चर्याची बाब आहे. बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

Web Title: Meteorite dropped from the sky in britain is extremely rare it will show the history of life on earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.