बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:12 PM2021-03-09T14:12:56+5:302021-03-09T14:30:24+5:30

Trending Viral News in Marathi : हे मांस विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

Donkeys disappearing andhra pradesh meat sexual power | बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

बापरे! लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी गाढवाचं मास खाताहेत लोक; या राज्यात सर्वाधिक गाढवांचा बळी

Next

देशात गाढवांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच गाढवांच्या संख्येत वाढ झाली नाही तर या प्राण्याच्या प्रजाती पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. जनावरांची संख्या कमी होण्यामागे मांसासाठी त्यांची होणारी हत्या हे सगळ्यात मोठं कारण आहे. भारतीय खाद्य सुरक्षा प्रधिकरण म्हणजेच एफएसएसआयनं दिलेल्या माहितीनुसार  गाढवं प्राणी खाद्याच्या नावावर नोंदणीकृत नाहीत. म्हणून त्यांना मारणं अवैध आहे. 

आंध्र प्रदेशातील गाढवं नामशेष  होण्याच्या मार्गावर आहेत. गाढवांना मारून त्यांचे अवशेष फेकून दिले जात आहेत.  त्यामुळेच लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे. बाजारात जवळपास गाढवाचं मास ६०० रूपये किलोंनी विकलं जात आहे. हे मास विकणारे लोक एक गाढव विकत घेण्यासाठी  १५ ते २० हजार रुपये मोजत आहेत. अशा स्थितीत मांस मिळवण्यासाठी गाढवांना अंधाधुंध कापलं जात आहे. या प्रकाराला रोखणं आता सरकारपुढे मोठं आव्हान ठरत आहे.

भारतात गाढवाच्या मांसाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर लोक खाण्यासाठी करत आहेत. आंध्र प्रदेशात गाढवांच्या मांसाबाबत अनेक मान्यता आहेत. लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाच्या मासांमुळे अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवता येऊ शकते. गाढवाचं मास खाल्ल्यामुळे लैंगिक शक्ती वाढते असं त्यांचं मत आहे. त्यामुळे जेवणात गाढवाच्या मासाचं प्रमाण वाढवलं आहे. आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवांना मारलं जात आहे. यात कृष्णा, प्रकाशम, गुंटूरसह अन्य काही भागांचा समावेश आहे. याठिकाणच्या लोकांमध्ये गाढवाचं मास खाण्याचे प्रमाण वाढले आहे.

एनिमल रेस्क्यू ऑर्गनाईजेशनचे सदस्य गोपाल, आर सुरबाधुला यांनी सांगितले की, ''वास्तविक पाहता गाढवांवर हे मोठं संकट ओढावलं आहे.  या राज्यात गाढवं जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गाढवांना अवैधरित्या मारलं जात आहे. स्थानिक नगरपालिका सुप्रिम कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे.''  खरं की काय? आकाशातून पडलेली दगडं गोळा करता करता करोडपती बनला हा माणूस; तुम्ही काय करताय?

२०१९ मध्ये आंध्र प्रदेशात गाढवांची लोकसंख्या फक्त ५ हजार इतकी होती.  त्याचवर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रातही गाढवांची संख्या वेगानं कमी होत आहे. त्यावेळी तत्कालीन पशू अधिकारी आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी गाढवांना अवैधरित्या मारण्याचं वाढतं प्रमाण लोकसंख्या कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले होते. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

Web Title: Donkeys disappearing andhra pradesh meat sexual power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.