खरं की काय? आकाशातून पडलेली दगडं गोळा करता करता करोडपती बनला हा माणूस; तुम्ही काय करताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 03:15 PM2021-03-08T15:15:06+5:302021-03-08T15:24:12+5:30

Trending Viral News in Marathi : अमेरिकेतील एरिजोनाचा रहिवासी असलेला हा माणूस जगभरात उल्कापिंड डिलरच्या रुपात प्रसिद्ध झाला आहे.

आकाशातून पृथ्वीवर पडत असलेल्या उल्कापिंडांना एकत्र करून एका माणसानं कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. या माणसाचं नाव माईक फार्मर आहे. अमेरिकेतील एरिजोनाचा रहिवासी असलेला हा माणूस जगभरात उल्कापिंड डिलरच्या रुपात प्रसिद्ध झाला आहे.

द सनच्या एका रिपोर्टनुसार माईल फार्मरने उल्कापिंड एस्ट्रोनॉमर्स पासून अनेक श्रीमंत लोकांना विकलं आहे. पण हे उल्कापिंड जमा करणं वाटतं तितकं सोपं काम मुळीच नाही. अनेकदा उल्कापिंडच्या शोधात असताना माईक फार्मर यांच्या जीवाला धोकासुद्धा उद्भवला आहे.

उल्कापिंडच्या शोधात असलेल्या माईक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एडवेंचर गोष्टी करायला खूप आवडते. म्हणून ते उल्कापिंडाच्या शोधात लांबलांबच्या शहरांमध्ये जातात. उल्कापिंड कुठे पडू शकतं याचा आधी अंदाज लावला जातो. त्यानंतर शोध घेऊन त्या ठिकाणी पोहोचतात.

माईक फार्मर उल्कापिंड मिळाल्यानंतर त्याला योग्य किमतीत विकून टाकतात. त्यांनी सांगितले की, ''स्टुडेंट लोनच्या पैश्यातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये काही दगडाच्या तुकड्यांना विकत घेतलं होतं. ''

यावेळी फार्मरनं मोराक्कोचा दौरा केला होता. त्या ठिकाणी एक मोठा दगड( मून रॉक) विकत घेतला होता. सुरूवातीला त्यांना या दगडाबाबत काहीच कल्पना नव्हती. पण नंतर याच दगडाची विक्री ७ कोटी ३२ लाख रूपयांना झाली.

या पैश्यांनी त्यांनी आपले कर्ज फेडले आणि नवीन घर सुद्धा विकत घेतलं.