सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 12:11 PM2021-03-07T12:11:39+5:302021-03-07T12:17:50+5:30

Health Tips in Marathi : टॉयलेटमध्येही अनेकजण मोबाइल घेऊन जातात आणि तिथे बसल्या-बसल्या फोनचा वापर करतात ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. 

Toilet habits that are harmful to health and give you infections | सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

Next
लोकमत रेटिंग्स

तुम्हीसुद्धा बाथरूममध्ये जर मोबाईल घेऊन जात असाल तर ही सवय आज बदला. कारण तुमची हीच वाईट सवय अनेकदा तुम्हाला संक्रमणाचं शिकार बनवू शकते. इतकंच नाही तर गंभीर समस्यांचे कारणही ठरू शकते. काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ लोक मोबाइल त्यांच्यापासून दूर ठेवत नाही. इतकेच काय तर टॉयलेटमध्येही अनेकजण मोबाइल घेऊन जातात आणि तिथे बसल्या-बसल्या फोनचा वापर करतात ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. 

एका वेबसाईटशीसोबत बोलताना ब्रिटनचे डॉ. साराह जर्विस यांनी सांगितले होते की, तुम्ही किती उशीरापर्यंत कमोडवर बसून राहता, त्यानुसार तुम्हाला पाइल्स होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. तुम्ही टॉयलेटमध्ये जेवढा जास्त फोनचा वापर कराल, तेवढा जास्त वेळ तुम्ही कमोडवर बसाल. ज्याने ऐनस आणि लोअर रेक्टमच्या मांसपेशीं आणि नसांवर प्रेशर वाढू लागतं. यानेच तुम्हाला पाइल्सचा धोका अधिक राहतो. 

असे संक्रमित होतात लोक

घरातील कोणत्याही जागेपेक्षा बाथरूममध्ये सगळ्यात जास्त बॅक्टेरिया असतात. नळ, हॅण्डल, दरवाजे आणि कुंड्यांवर सगळ्यात जास्त किटाणू असतात. असे किटाणू आपल्याला कधीच दिसत नाहीत. अनेकदा बाथरूमध्ये फोन घेऊन गेल्यास फोनवर  हे बॅक्टेरिया बसतात. जर्नल एनल्स ऑफ क्लीनिकल माइक्रोबायोलॉजी एंड एंटीमाइक्रोबायल्समध्ये छापलेल्या एका अध्ययनानुसार लोकांच्या फोनमध्ये  ९५ टक्क्यांपेक्षा अधिक संक्रमणाचे बॅक्टेरिया असतात. त्यात साल्मोनेला, ई कोली आणि सी डिफिसाईल यांचा समावेश असतो. 

टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया आपल्या फोनमध्ये असतात.

बाथरूमध्ये फोन घेऊन जाणं इतकं धोकादायक आहे. याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. एरिजोना युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार स्मार्टफोनमध्ये  २० टक्क्यांपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. वॉशरूमधून बाहेर आल्यानंतर तुम्ही हात धूत असाल पण मोबाईल मात्र  स्वच्छ केला जात नाही. मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार!

कमोडवर बसल्यानं वाढतो पाईल्स धोका

आतापर्यंत शौच येण्यासाठी जोर लावल्याने पाइल्सची तक्रार होत होती. तसेच गर्भवती महिलांना, सतत खोकला, कफ असणाऱ्यांना आणि वयोवृद्ध लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळत होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये आढळलं की, जे लोक कमोडवर बसून मोबाइलचा अधिक वापर करतात, त्यांनाही पाइल्सची समस्या होत आहे. पाईल्सचा धोका टाळायचा असेल तर आहारात फायबरचं प्रमाण वाढवा, पाणी जास्तीत जास्त सेवन करा, रोज नियमित एक्सरसाइज करा. तसेच टॉयलेटला जाताना फोन बाहेरच ठेवा. कमोडवर बसून फोनचा वापर करू नये. सावधान! तुम्हीसुद्धा जेवता जेवता पाणी पिताय का? मग शरीराचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं

Web Title: Toilet habits that are harmful to health and give you infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app