'या' कुत्र्याच्या नाकावर फिदा झाले लोक, तुम्हीही आधी पाहिला नसेल असा कुत्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 14:53 IST2019-10-16T14:52:48+5:302019-10-16T14:53:06+5:30

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रजातींच्या कुत्र्यांचे फोटो आपण नेहमीच पाहत असतो. पण त्यातील बहुतेक आपण पाहिलेलेच असतात. अशात सध्या इन्स्टाग्रामवर एका लांब तोंडाच्या कुत्र्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Meet this dog with super long nose becomes internet sensation pics goes viral | 'या' कुत्र्याच्या नाकावर फिदा झाले लोक, तुम्हीही आधी पाहिला नसेल असा कुत्रा!

'या' कुत्र्याच्या नाकावर फिदा झाले लोक, तुम्हीही आधी पाहिला नसेल असा कुत्रा!

इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या प्रजातींच्या कुत्र्यांचे फोटो आपण नेहमीच पाहत असतो. पण त्यातील बहुतेक आपण पाहिलेलेच असतात. पण अशात सध्या इन्स्टाग्रामवर एका लांब तोंडाच्या कुत्र्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या कुत्र्याचं नाव एरिस असून याचं नाक आणि तोंड इतर कुत्र्यांपेक्षा अधिक लांब आहे. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, हा कुत्रा केवळ एक वर्षांचा आहे.

या कुत्र्याच्या वेगळेपणामुळे या कुत्रा अनेकांच्या पसंत पडत आहे. त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट असून त्याचे तब्बल १ लाख फॉलोअर्स आहेत.

Joey Kidd Kambourian याच हा कुत्रा असून २०१८ मध्ये त्यांनी हा कुत्रा पाळला होता. इन्स्टाग्रामवर या कुत्र्याची इतकी लोकप्रियता आहे की, त्याला आता प्रत्यक्षात लोक भेटायला जातात.

हा एक वेगळ्या प्रजातीचा कुत्रा असून इतर कुत्र्यांपेक्षा या कुत्र्याची हुंगण्याची क्षमता अधिक आहे.

 


Web Title: Meet this dog with super long nose becomes internet sensation pics goes viral