बाबो! लग्नाला आलेल्या पाहुण्यांना पठ्ठ्यानं असं काही सॅनिटाईज केलं; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By manali.bagul | Published: December 1, 2020 03:16 PM2020-12-01T15:16:25+5:302020-12-01T15:39:29+5:30

Viral Video in Marathi: कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खूप कमी लोकांना लग्नांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. आलेल्या पाहूण्यांना पूर्णपणे सॅनिटाईज केलं जात आहे.

Man sanatize in wedding ias officer awanish sharan share video and gives epic reaction | बाबो! लग्नाला आलेल्या पाहुण्यांना पठ्ठ्यानं असं काही सॅनिटाईज केलं; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

बाबो! लग्नाला आलेल्या पाहुण्यांना पठ्ठ्यानं असं काही सॅनिटाईज केलं; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Next

सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल की नवीन सिस्टीम आली आहे.  कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खूप कमी लोकांना लग्नांमध्ये आमंत्रित केलं जात आहे. आलेल्या पाहूण्यांना पूर्णपणे सॅनिटाईज केलं जात आहे. आईएएस ऑफिसर अवनीष शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी अशाच एका लग्नातील व्हिडीओ  सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या व्हिडीओ पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस पाठीवर बॅग अडकवून लग्नाच्या मंडपात सॅनिटाईज करत आहे. यावेळी मंडपात अनेक पाहूणे मंडळी बसली आहे. जणूकाही अत्तर शिंपडल्याप्रमाणे हा माणूस लोकांच्या अंगावर सॅनिटायजर टाकत आहे. या व्हिडीओत मंगलाष्टकांचा आवाज मागून येत आहे. या व्हिडीओवर फारच विनोदी रिएक्शन्स येत आहेत. आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ

अवनीष शरण यांनी या फोटोला गमतीदार कॅप्शन दिलं आहे की, एकवेळ अशी होती जेव्हा लग्न समारंभात अत्तर शिंपडलं जात होतं. आणि आता......  . २९ नोव्हेंबरला हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आता १८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळले असून १ हजारापेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. १६५ पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

Web Title: Man sanatize in wedding ias officer awanish sharan share video and gives epic reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.