Mommy mouse rescues baby from snake mouth video goes viral | आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ

आई ती आईच...! सापाच्या तोंडात सापडलेल्या उंदरांच्या पिल्लाला अखेर आईनं वाचवलं, पाहा व्हिडीओ

आईची महानता कोणीही शब्दात व्यक्त करू शकत नाही. नेहमीच वेगवेगळ्या प्रसंगातून आईचं प्रेम आणि वीरता व्यक्त होत असते. इतिहासातही आईने आपल्या मुलांसाठी केलेल्या कसरतीची अनेक उदाहरण सापडतात. फक्त माणसांच्या बाबतीत हे लागू होतं असं अजिबात नाही. प्राण्यांमध्येही आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी आईची सुरू असलेली धडपड दिसून येते. सध्या सोशल मीडियावर सापाचा आणि उंदराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, जर तुम्ही आईचं साहस पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सापाने एका उंदराच्या पिल्लाला तोंडात धरले आहे. 

या उंदराच्या पिल्लाला सापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी दुसरा उंदिर प्रयत्न करत आहे. आपल्या जीवाशी खेळत पिल्लाला वाचवण्याकरता उंदीर सापाच्या मागे पळत आहे. अखेर उंदराच्या प्रयत्नांना यश मिळते आणि सापाच्या तावडीतून उंदरांच्या पिल्लाची सुटका होते. त्यानंतर साप गवताच्या दिशेने लांब निघून जातो. साप पूर्ण लांब निघून गेलाय ना, याची खात्री करून मगच उंदीर आपल्या पिल्लाकडे परत येतो.  वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

आतापर्यंत  २७ हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे. तसंच ३ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ही अविश्वसनिय घटना असल्याची प्रतिक्रिया लोकांकडून आली आहे. तर अनेकांनी जूना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असल्याचेही म्हटलं आहे. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mommy mouse rescues baby from snake mouth video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.