शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इतका शौकीन माणूस कधी बघितलाय का? १ लाखाच्या स्कूटीसाठी खरेदी केला इतक्या लाखांचा नंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:19 IST

हिमाचल प्रदेशमध्ये एका व्यक्तीने व्हीआयपी क्रमांकासाठी लाखो रुपये खरेदी केला आहे.

VIP Number: शौक बड़ी चीज है... हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एका तरुणाने असं काही केलंय जे पाहून लोक हेच म्हणत आहेत. हिमाचल प्रदेशातील संजीव कुमार यांनी फक्त १ लाख रुपयांच्या स्कूटीसाठी १४ लाख रुपयांचा व्हीआयपी नंबर खरेदी केला. आवडीच्या समोर कोणतीही किंमत दिसत नाही, असं संजीव कुमार म्हणतात. संजीव कुमार यांच्या या महागड्या आवडीची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा आवडीच्या गोष्टीसाठी किंमतीची मर्यादा ओलांडण्यात आली आहे. माध्यमांच्या नुसार, हमीरपूर येथील संजीव कुमार यांनी HP21C-0001 हा व्हीआयपी क्रमांक तब्बल १४ लाख रुपयांना खरेदी केला आहे. परिवहन विभागाच्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेअंतर्गत त्यांना हा नंबर मिळाला, जो आतापर्यंतचा सर्वात महागडा दुचाकी क्रमांक मानला जात आहे. या लिलावामध्ये फक्त दोन जणांनी भाग घेतला होता. संजीव कुमार यांनी सर्वात जास्त बोली लावल्यामुळे त्यांना हा अनोखा क्रमांक मिळाला.

वाहतूक विभाग व्हीआयपी क्रमांकांसाठी लिलाव करतो, ज्यासाठी ऑनलाइन बोली लावली जाते. हा क्रमांक देखील वाहतूक विभागाच्या ऑनलाइन लिलाव प्रक्रियेद्वारे मिळवण्यात आला होता. या बोलीमध्ये सोलन जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने १३.५ लाख रुपयांची बोली लावली होती. मात्र संजीव कुमार यांनी त्यांना मागे टाकत त्यांनी हा नंबर १४ लाख रुपयांना खरेदी केला.

त्यानंतर आता ही रक्कम हिमाचल सरकारच्या खात्यात महसूल म्हणून जमा करण्यात आली आहे. यामुळे सरकारला कोणत्याही अतिरिक्त संसाधनांशिवाय १४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. परिवहन विभागाच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दुचाकी क्रमांक असू शकतो. संजीव कुमार म्हणाले की त्यांना विशेष क्रमांकांची आवड आहे. त्यांनी हा क्रमांक त्यांच्या नवीन स्कूटीसाठी खरेदी केला आहे. आवडीला किंमत नसते आणि जेव्हा तुम्हाला काहीतरी विशिष्ट हवे असते तेव्हा तुम्ही थांबत नाही, असं संजीव कुमार म्हणाले.

दरम्यान, केरळमधून असाच एक प्रकार समोर आला होता. कोची येथील आरटीओने एका लिलावात '०००७' हा नंबर सुमारे ४६ लाख रुपयांना विकला. एका सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या लक्झरी कार 'लॅम्बोर्गिनी उरुस'साठी हा नंबर खरेदी केला होता. या कारची किंमत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. लिलावानंतर या कारला 'केएल०७ डीजी ०००७' हा नंबर मिळाला.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशSocial Viralसोशल व्हायरल