Gulab Jamun and pav combination on twitter people are reacting | नाही..नाही..नाही! गुलाबजाम आणि वड्याचा लोकांवर इमोशनल अत्याचार, बेक्कार भडकले लोक्स.....
नाही..नाही..नाही! गुलाबजाम आणि वड्याचा लोकांवर इमोशनल अत्याचार, बेक्कार भडकले लोक्स.....

हे सर्वांनाच माहीत आहे की, दिवसेंदिवस लोकांची लाइफस्टाईल बदलत आहे. लोकांच्या सवयी, आवडी-निवडी बदलत आहेत. लोकांच्या खाण्याच्या आणि पिण्याच्याही सवयी बदलत आहे. याच खाण्याच्या बदलत्या सवयीसंबंधी एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून खाण्याची इतकी सवय बदलल्याचं पाहून जरा अवघड वाटतंय. म्हणजे तुम्हीच सांगा ना की, कोण गुलाबजाम आणि पाव खाईल?

Catty Stark नावाच्या व्यक्तीने हा फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. मग काय लोक यावर मजेदार कमेंट करण्यासाठी तुडून पडलेत. अनेकांना हे फोटोत दिसतंय ते अजिबातच सहन झालेलं नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना अशा काही व्यक्ती केल्या की, विचारू नका. ते तुम्हीच बघा.

याआधीही अशाप्रकारचे काही विचित्र फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होेते. म्हणजे एकाने मॅगी दुधात टाकून खाल्ली होती. आता तुम्ही सांगा हे कलयुग नाही तर काय आहे....?


Web Title: Gulab Jamun and pav combination on twitter people are reacting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.