Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:38 IST2025-06-02T14:37:45+5:302025-06-02T14:38:37+5:30

गौरव गुप्ताचा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल..!

'Code name? Say Hanuman Chalisa...', Gaurav Gupta Roasted Pakistani Fan | Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी

Video: 'कोड नेम? हनुमान चालीसा...', शोमध्ये आलेल्या पाकिस्तानी व्यक्तीची घेतली फिरकी

Gaurav Gupta Roasted Pakistani Fan: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतरभारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सेलिब्रिटींना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांचे सर्व शोज आणि चित्रपटही बॅन करण्यात आले आहेत. या सगळ्यात भारतीय स्टँडअप कॉमेडियन गौरव गुप्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका पाकिस्तानी प्रेक्षकाची अशी फिरकी घेतो की, उपस्थित सर्वजण पोट धरुन हसतात. 

गौरव गुप्ताचा हा व्हायरल व्हिडिओ अमेरिका-कॅनडा दौऱ्यातील आहे. त्याने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गौरवला कळते की, त्याच्या प्रेक्षकांमधील कुणी पाकिस्तानी आहे. त्यानंतर तो त्या प्रेक्षकाची फिरकी घ्यायला सुरुवात करतो. प्रेक्षकांना कळताच लोक सिंदूर-सिंदूर ओरडू लागतात. त्यावर गौरव त्या पाकिस्तानी व्यक्तीला म्हणतो, भाऊ, तुमच्यात इथे येण्याची खूप हिंमत आहे. 

व्हिडिओ पाहा:-


त्यानंतर गौरव त्याला मस्तरीत हनुमान चालीसा म्हणायला लावतो. हे ऐकताच सर्वजण खूप हसू लागतात. गौरव पुढे त्याला नाव विचारतो. त्या व्यक्तीने नाव सांगताच, आता कोड नेम सांग म्हणतो. यावरही सर्जवण पोट धरुन हसतात. सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो लाईक्स आणि व्हूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंटसही करत आहेत.

Web Title: 'Code name? Say Hanuman Chalisa...', Gaurav Gupta Roasted Pakistani Fan