शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:02 IST

रेल्वे तिकीट वैयक्तिक युजर आयडीवर आॅनलाईन काढून त्या तिकिटांची प्रवाशांकडून अधिक रक्कम स्वीकारून तिकिटाचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (४१, रा. नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवलीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकएक दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली : रेल्वे तिकीट वैयक्तिक युजर आयडीवर आॅनलाईन काढून त्या तिकिटांची प्रवाशांकडून अधिक रक्कम स्वीकारून तिकिटाचा काळाबाजार केल्याच्या संशयावरून कणकवलीतील एकास अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत अरविंद डेगवेकर (४१, रा. नरडवे रोड, वरचीवाडी) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.ही कारवाई शनिवारी दुपारी तेली आळी येथील दुकानात करण्यात आली. संशयित आरोपी डेगवेकर याने आयआरसीटीसी या संकेतस्थळावर स्वत:च्या युजर आयडीवरून गेल्या दोन महिन्यांत काही तिकिटे आॅनलाईन बुकींग केली. ही तिकिटे प्रवाशांना तिकीटाच्या दरापेक्षा अधिक दराने विकली. संशयित आयडी आयआरसीटीच्या मुख्यालयाला आढळून आला.या आधारावर हा आयडी रेल्वेच्या बेलापूर येथील सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. याची चौकशी कोकण रेल्वेचे सिंधुदुर्ग विभागाचे पोलीस निरीक्षक अजय कुमार यांच्याकडे देण्यात आली. त्यांच्या पथकाने चौकशी दरम्यान तेलीआळीतील संशयित आरोपी डेगवेकर याची तपासणी केली. या तपासणीत संशयित आरोपीने एकाच दिवशी ६० तिकीट बुकींग केल्याचे स्पष्ट झाले.यातील एका रद्द झालेल्या तिकीटाची रक्कमही प्रवाशांकडून घेतली. त्यामुळे याप्रकरणी अटक करून संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याअंतर्गत १० हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. याविषयी माहिती देताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरूण लोटे म्हणाले, एखादी व्यक्ती एका महिन्यात आपल्या कुटुंबातील लोकांसाठी केवळ ६ तिकिटे आॅनलाईन बुकींग करू शकते.मात्र, रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे संशयित आरोपी सातत्याने आयडी बदलून प्रमाणापेक्षा अधिक तिकिटे बुकींग करतात. तसेच प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी आयआरसीटीसीतर्फे संशयास्पद आयडी तपासले जातात.

अशाप्रकारे तपासणीत संशयित आरोपी डेगवेकर याचा आयडी सापडला. त्या आधारावर चौकशी केली असता तिकिटाचा काळाबाजार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. अशाचप्रकारे कुडाळमध्येही कारवाई झाली आहे. उपनिरीक्षक अरुण लोटे यांच्यासह जवान भूषण कोचरेकर, विपुल म्हस्के आणि कोकण रेल्वेच्या संगणक तज्ज्ञांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग