महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी : बसमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:11 IST2019-11-25T11:09:59+5:302019-11-25T11:11:03+5:30

मालवण : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्न करण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी शहरातील एका तरुणाविरोधात येथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ...

Threat to a college student: Incidents on the bus | महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी : बसमधील घटना

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धमकी : बसमधील घटना

ठळक मुद्देतरुणाविरोधात गुन्हा दाखलयापूर्वीही या तरुणाने प्रेमप्रकरणातून हाताची नस कापून घेतली होती.

मालवण : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्न करण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी शहरातील एका तरुणाविरोधात येथील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सुकळवाड ते मालवण दरम्यान एसटी बसमध्ये घडला. याबाबतची तक्रार संबंधित तरुणीने दिली आहे.

संबंधित तरुणी कणकवली येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाते. शनिवारी सायंकाळी ती एसटी बसफेरीने घरी परतत असताना शहरातीलच एका तरुणाने सुकळवाड येथे एसटी बसमध्ये प्रवेश केला. संबंधित तरुणीला त्याने ह्यतू माझ्याशी लग्न करह्ण असे सांगत धमकी दिली. यापूर्वीही या तरुणाने प्रेमप्रकरणातून हाताची नस कापून घेतली होती.

त्यावेळी पोलिसांनी त्याला योग्य ती समज दिली होती. मात्र, पुन्हा त्याच तरुणाने त्या तरुणीला लग्नासाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तरुणाला व पालकांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते.

Web Title: Threat to a college student: Incidents on the bus