शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

माजगावात एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

गुरुनाथ पेडणेकर : नाट्य कलेतून समाजप्रबोधन व्हावे

सावंतवाडी : समाज प्रबोधनासाठी नाट्यकलेचा वापर होणे गरजेचे आहे. एकांकिका स्पर्धेचे सद्गुरु मंडळाचे चौदावे वर्ष असून एखादी परंपरा पुढे सरू ठेवण्याचा वारसा हे मंडळ चालवत आहे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांनाही विविध चांगल्या कलाकृती पाहण्याचा व आपली कला सादर करण्यास वाव मिळत आहे, असे प्रतिपादन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केले.सद्गुरू कृपा मित्र परिवार, माजगाव या मंडळाच्यावतीने आयोजित खुल्या एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर तसेच भारत सरकारची दक्षता गुण नियंत्रण समिती सदस्य विकास सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात आयोजित ही स्पर्धा तीन दिवस सुरू आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एच. बी. सावंत, माजगाव शिक्षण सहायक संस्थेचे सचिव लक्ष्मण नाईक, सामाजिक कार्यकर्ते अजित वारंग, मूर्ती कासार, विलास परांजपे, हर्षवर्धन धारणकर, इन्सुली शाळेचे मुख्याध्यापक लहूराम गावडे व परीक्षक उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष भास्कर कासार यांनी स्वागत केले. जगदीश सावंत यांनी सूत्रसंचालन, तर संजय सावंत यांनी आभार मानले. यावेळी विजय सावंत, विठ्ठल सावंत, अरविंद रेडकर, हेमंत गाड, रवींद्र कानसे, उमेश सावंत, कांतू सावंत, प्रशांत मोरजकर व मंडळाचे सदस्य, सभासद, माजगाव हायस्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजगावचे सरपंच आबा सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांनी पत्राद्वारे आपल्या शुभेच्छा पाठविल्या. यावेळी सन २०१४ मध्ये दहावी परीक्षेमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा, मुख्याध्यापक एच. बी. सावंत, प्रमोद सावंत, अजय सावंत व अनिल भिसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)