शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सिंधुदुर्ग : सेनेचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे : अतुल रावराणेंचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:22 IST

रिफायनरी प्रकल्पावरून स्वाभिमान पक्ष स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेला भडकविण्याचे काम करीत आहे. तर या प्रकल्पाबाबत शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत, असा गंभीर आरोप भाजपा नेते व सिंधुदुर्ग जिल्हा मतदार नोंदणी अभियानाचे प्रमुख अतुल रावराणे यांनी केला

ठळक मुद्देसेनेचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे : अतुल रावराणेंचा गंभीर आरोपनाणार रिफायनरी प्रकल्पावरून स्वाभिमानसह नीतेश राणेंवरही शरसंधान

देवगड : रिफायनरी प्रकल्पावरून स्वाभिमान पक्ष स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेला भडकविण्याचे काम करीत आहे. तर या प्रकल्पाबाबत शिवसेनेचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत, असा गंभीर आरोप भाजपा नेते व सिंधुदुर्ग जिल्हा मतदार नोंदणी अभियानाचे प्रमुख अतुल रावराणे यांनी केला. स्वाभिमान पक्ष हा स्वार्थाभिमानी पक्ष असून आमदार नीतेश राणे हे उत्कृष्ट स्टंटमॅन आहेत, असा उपरोधिक टोलाही रावराणे यांनी लगावला.जामसंडे येथील भाजपा संपर्क कार्यालयात देवगड तालुका नवीन मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ अतुल रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी स्वाभिमान पक्ष व नीतेश राणे यांच्यावर घणाघाती टीका केली.यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा परिषद सदस्या मनस्वी घारे, नगरसेवक सुभाष धुरी, राजेंद्र वालकर, हर्षा ठाकूर, प्राजक्ता घाडी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, शैलेंद्र जाधव, संतोष फाटक उपस्थित होते.भाजपाचा नवीन मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ देवगड तालुक्यातून करण्यात आला. यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्यास त्यांना सामोरे जाण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षमपणे उभा राहणार आहे.

गेल्या चार वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील घटकांपर्यंत राबविल्या गेल्या आहेत. येत्या निवडणुकीत आम्ही केलेल्या कामांची पोचपावती जनतेकडून नक्कीच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देवगड हा भाजपाचा पारंपरिक गड म्हणून ओळख होती. मात्र गत निवडणुकीत झालेला पराभव पुसून टाकून भाजपाचा हा गड आगामी निवडणुकीमध्ये परत मिळविणारच असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.ते म्हणाले, नीतेश राणे यांनी देवगडमध्ये चित्रपटगृहाच्या माध्यमातून मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु मनोरंजनाअगोदर येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हे ते विसरले. त्यामुळे केवळ लोकांना दाखविण्यासाठी योजना जाहीर करायच्या आणि नंतर महिन्या-दोन महिन्यांत त्या बंद पाडायच्या एवढेच काम नीतेश राणेंनी केल्याचा गंभीर आरोप रावराणे यांनी केला.स्वार्थासाठी लोकांना भडकविण्याचे कामरिफायनरी प्रकल्पाला स्वाभिमान पक्षाकडून होत असलेला विरोध हा स्वत:च्या स्वार्थासाठी असून या स्वार्थासाठीच जनतेला भडकविण्याचे काम ते करीत आहेत. यातून मलिदा मिळविण्याचा त्यांचा इरादा असल्याचा आरोप अतुल रावराणे यांनी केला.स्वाभिमान पक्ष हा स्वार्थाभिमानी असल्याचे दिसून येत आहे. रिफायनरी प्रकल्प होणार की नाही याविषयी देवगडवासीय ठरवतील व त्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.राणे कुटुंबीयांनी सत्तेत असताना केवळ स्वार्थासाठी लोकांना भडकवून भावनेचे राजकारण करू नये, असा सल्लाही रावराणे यांनी यावेळी दिला.नीतेश राणे हे स्टंटमॅनगेल्या चार वर्षांत राणे यांनी घोषणाबाजीच केली. प्रत्यक्षात ठोस अशी कामे केली नाहीत. त्यांनी विकासात्मक योजना राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन-चार महिन्यांत त्या बंद पडल्या. यात औषध आपल्या दारी, वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटरस्पोर्टस् या योजना बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नीतेश राणे हे केवळ स्टंटबाजी करणारे स्टंटमॅन आहेत, असा टोला रावराणे यांनी लगावला. 

टॅग्स :BJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग