शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत सर्व्हिस रोड लगतचा साईड प्लेटचा पत्रा कोसळला कारवर ; पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 16:44 IST

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन ्चा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे,

ठळक मुद्देकणकवलीत सर्व्हिस रोड लगतचा साईड प्लेटचा पत्रा कोसळला कारवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉंनचा हलगर्जीपणा पुन्हा एखदा उघड झाला आहे.

कणकवलीतील उबाळे मेडिकल समोर चालत्या कारवर साईड प्लेटचा पत्रा कोसळला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने दुर्घटना टळली आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील उबाळे मेडिकलसमोरदिगंबर शांताराम भोसले हे आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर ( क्रमांक एम. एच-४३-ए.एफ.२१३७) ही कार घेऊन आले. ते कलमठच्या दिशेने जात होते.

भोसले आपल्या ताब्यातील कार चालवत असताना अचानक दिलीप बिल्डकॉनने सर्व्हिस रोड लगत उभा केलेला साईड प्लेटचा पत्रा कोसळला.

उड्डाणपुलाच्या बॉर्डर स्लॅबसाठी ठेकेदार दिलीप बिल्डकॉनने लोखंडी सांगाडा उभारला आहे. त्यालगत असलेला सर्व्हिस रोडवरील पत्रा कारवर अचानक कोसळला.

हा कोसळणारा पत्रा पाहून भोसले यांनी प्रसंगावधान राखून चपळाईने कार पुढे नेली. त्यामुळे तो पत्रा कारच्या मागील भागावर कोसळून कारचे नुकसान झाले.मात्र, मोठी दुर्घटना टळली.

या घटनेमुळे ठेकेदाराच्या कामातील बेजबरदारपणाचा प्रत्यय पुन्हा कणकवली शहरवासियांना आला आहे.दिगंबर भोसले यांनी ऍड. स्वप्नील सावंत यांच्यासह कणकवली पोलीस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार दिली.

ठेकदाराने प्रवासी, वाहनचालक यांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करत काम सूरु ठेवल्याबाबत तक्रार दाखल करून घेण्याचा भोसले यांनी पोलिसांना आग्रह केला.

मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२७ नुसार दिलीप बिल्डकॉन विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

कणकवली शहरात बॉक्सेलचा कोसळलेला भाग, स्लॅबचे काँक्रीट ओतणे सुरू असतानाच जमीनदोस्त झालेला उड्डाणपुलाचा बॉर्डर स्लॅब आणि आता चालत्या गाडीवर कोसळलेला वजनदार पत्रा असा हलगर्जीपणा घडूनही ठेकेदारावर अजूनपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच महामार्ग कामामुळे मोठी दुर्घटना घडावी याची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे,

 

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग