शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

येणाऱ्या चाकरमान्यांची आंबोली बस स्थानकावर आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:43 IST

चाकरमान्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या नोंदी जिल्ह्याच्या हद्दीवर ठेवण्यासाठी आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ असलेले तपासणी पथक आता आंबोली बस स्थानकावर हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देआंबोली पोलीस तपासणी नाका बस स्थानकावरखबरदारीचा उपाय म्हणून चौवीस तास पथकही राहणार कार्यरत

आंबोली : कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सव काळात सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या नोंदी जिल्ह्याच्या हद्दीवर ठेवण्यासाठी आंबोली पोलीस तपासणी नाक्याजवळ असलेले तपासणी पथक आता आंबोली बस स्थानकावर हलविण्यात आले आहे.

गणेशोत्सव काळात पुणे, मुंबई, कोल्हापूर तसेच कर्नाटक, गुजरात या भागातून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. सिंधुदुर्गात येण्यासाठी चाकरमानी पुणे, कोल्हापूर, आंबोलीमार्गे सिंधुदुर्ग या रस्त्याला जास्त पसंती दिली जात आहे.मुंबई-पुणे येथून येणाऱ्या लोकांच्या वाहनांची गर्दी व स्थानिकांना त्यापासून कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून हे तपासणी नाके आंबोली बसस्थानकावर हलविण्यात आले आहे. याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा असून तपासणी करणेही सोपे जाणार आहे.

या तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस उपनिरीक्षक, सह पोलीस कर्मचारी उपस्थित असणार आहेत. आंबोलीमार्गे सिंधुदुर्गात येण्यासाठी या तपासणी नाक्यावर आपल्या नोंदी करूनच व सर्दी खोकला ताप अशी काही लक्षणे असल्यास त्याचे कडक आरोग्य तपासणी करून, ई पासच्या तपासणी नंतरच सिंधुदुर्गात प्रवेश दिला जाणार आहे.आंबोली बाजारपेठ आजपासून महिनाभर राहणार बंद१ ते ३१ आॅगस्टपर्यात आंबोलीमध्ये अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायत आंबोलीतर्फे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. आंबोलीमार्गे बरेच मुंबई पुणेकर चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. चाकरमान्यांसाठी हा मुख्य मार्ग आहे.यावेळी येथील चहा टपरी, छोटी मोठी भोजनालय, निवास व्यवस्थेची हॉटेल्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आंबोली हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असून येथील रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणेकर गणेशोत्सवानिमित्त दाखल होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने आंबोली बंद असल्याचे घोषित केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस