शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीचा प्रश्न मार्गी, दोडामार्ग तहसीलदार निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 11:06 IST

गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावत इमारत महसूलच्या ताब्यात घेतली.

ठळक मुद्देइमारतीचा प्रश्न मार्गी, दोडामार्ग तहसीलदार निवासस्थान पाच वर्षांपासून विनावापर धूळखात

दोडामार्ग : गेल्या पाच वर्षांपासून विनावापर धूळखात पडलेल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा अखेर सोमवारी गृहप्रवेश झाला. दोडामार्गचे चाळीसावे तहसीलदार म्हणून महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी निवासस्थानाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावत इमारत महसूलच्या ताब्यात घेतली.दोडामार्ग तालुक्याच्या तहसीलदारांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी तत्कालीन प्रभारी तहसीलदार विजय तळेकर यांनी पाच वर्षांपूर्वी शहरातील हनुमान मंदिराशेजारी जागा निवडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.

त्यानुसार ही इमारत मंजूर होऊन तब्बल २० लाखांचा निधी खर्ची घालून तहसीलदारांसाठी निवासस्थान इमारत बांधण्यात आली. मात्र, त्यानंतर चार वर्षे ही इमारत विनावापर धूळखात होती. बांधकाम विभागाने ती महसूलच्या ताब्यात दिली नव्हती.त्याचबरोबर महसूल यंत्रणेनेही या मध्यंतरीच्या कालावधीत म्हणावा तसा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा वापरत नसल्याने बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. झाडी वाढल्याने निधीचा अपव्यय होतो की काय अशी भीती व्यक्त होत होती.ती इमारत महसूलच्या ताब्यातमहिनाभरापूर्वीच दोडामार्गच्या तहसीलदारपदी रुजू झालेल्या तहसीलदार मोरेश्वर हाडगे यांनी पाठपुरावा करून निवासस्थान इमारतीचा प्रश्न मार्गी लावला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व सोपस्कार पूर्ण करून घेत इमारत महसूलच्या ताब्यात घेतली. सोमवारी या इमारतीचा गृहप्रवेश करण्यात आला. हिंदू पारंपरिक पद्धतीने ब्राह्मणपूजा करून हे निवासस्थान ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे आता तहसीलदारांच्या निवासस्थानाची समस्या मार्गी लागली आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग