शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चारजणांना पोलीस संरक्षण

By admin | Updated: May 18, 2014 00:25 IST

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचारात आघाडीवर राहिलेल्या माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधी प्रचारात आघाडीवर राहिलेल्या माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असल्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली आहे. जिल्ह्यातील अन्य तीनजणांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, गौरीशंकर खोत, आदींचा समावेश आहे. या सर्वांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणे संरक्षण देण्यात येणार्‍या व्यक्तिंची यादी प्रत्येक पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मंगेश तळवणेकर यांनी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. गांधी चौकात जाहीर सभाही तळवणेकर यांनी घेतली होती. तसेच शिवसेनेच्या प्रचारासाठी त्यांनी गावागावांत सभा घेत नागरिकांना शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या गावांमध्ये शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल शुक्रवारी लागलेले आहेत. त्यात शिवसेनेचे विनायक राऊत हे विजयी झाले आहेत. यात तळवणेकर यांच्या मतदारसंघात मिळालेले मताधिक्य पाहता त्यांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो म्हणून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)