शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:49 IST

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

ठळक मुद्देकणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !कणकवली शहरातून काढली जाणार भव्य मिरवणूक, चार दिवस कीर्तन महोत्सव !

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत पहाटे समाधी पूजन , काकड आरती , सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी , भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान , दुपारी आरती, महाप्रसाद आणि भजनांचा व सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव व रात्री ८ वाजता दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.३ डिसेंबर रोजी पुण्यतिथी दिन असून पहाटे समाधी पूजन , काकड आरती, जपानुष्ठान, भजने त्यानंतर समाधीस्थानी मन्यसुक्‍त पंचामृताभिषेक विधी होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद व भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर आरती होणार असून रात्री १२ वाजल्यानंतर हळवल येथील भालचंद्र दशावतार नाटयमंडळ यांचे दशावतारी नाटक होणार आहे.या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांनी उपस्थित रहावे . असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.चार दिवस कीर्तन महोत्सव !या पुण्यतिथी उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव होणार असून २९ नोव्हेंबर रोजी पुणे येथील ह .भ.प. किर्तनचंद्र श्रेयस बडवे यांचे ' नामदेवांना सदगुरु दर्शन' , ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथील ह. भ. प. रेशीम खेडकर यांचे ' संत सावतामाळी' , १ डिसेंबर रोजी मुंबई येथील ह.भ.प. वेदश्री ओक यांचे ' संत भानुदास महाराज' तर २ डिसेंबर रोजी अहमदनगर येथील ह.भ. प. प्रभंजन भगत यांचे ' राखा कुंभार ' या विषयावर कीर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ माधव गावकर, तबला शिवाजी पवार तर पखवाज साथ गजानन देसाई करणार आहेत. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग