शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

वागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 16:16 IST

Accident Highway Sindhudurg- मुंबई- गोवा महामार्गावर वागदे गोपुरी आश्रमासमोर माल वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ऊलटी होऊन बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील जखमी खुशमीन आजाद खान (रा. राजस्थान) या साडेसतरा वर्षीय युवकाचा गोवा-बांबोळी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंटेनर चालक मुन्फेद समसू खान (३०, रा. राजस्थान) याला महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.

ठळक मुद्देवागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू चालक गंभीर जखमी : रस्त्याचा अंदाज न आल्याने घटना

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे गोपुरी आश्रमासमोर माल वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ऊलटी होऊन बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील जखमी खुशमीन आजाद खान (रा. राजस्थान) या साडेसतरा वर्षीय युवकाचा गोवा-बांबोळी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंटेनर चालक मुन्फेद समसू खान (३०, रा. राजस्थान) याला महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा ते अहमदाबाद असा प्रवास कंटेनर (क्रमांक आर. जे. २३ जी. बी. १५२१) घेऊन मुन्फेद खान व खुशमीन खान हे करीत होते. ते कणकवली जवळ वागदे येथे आले असता मुन्फेद खान याला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्ता दुभाजकावर कंटेनर आदळला व बाजूला कलंडला. या अपघातात मुन्फेद खान व खुशमीन खान हे दोघे गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. चालक मुन्फेद याच्यासोबत त्याचा चुलत भाऊ खुशमीन हा गोवा पाहण्यासाठी आला होता. अपघातात खुशमीन याचा डावा पाय गुडघ्याखाली जायबंदी झाला होता. तसेच अतिरक्तस्रावही झाला होता.अधिक उपचारादरम्यान मृत्यूखुशमीन याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार रविकांत झरकर, पोलीस नाईक किशोर पाडावे, सुमित चव्हाण तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग