शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Maharashtra Election 2019 : नितेश राणेंचे भाजपामधील वय काय? संदेश पारकर यांचा जठारांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 8:56 AM

नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. #MaharashtraElection2019

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपाचे उमेदवार समोरासमोर उभे राहिले आहेत. माजी आमदार नितेश राणे यांना भाजपमध्ये घेत उमेदवारी दिल्याने भाजपामध्येच दोन गट पडले आहेत. एकीकडे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार राणेंसोबत तर युवा नेते संदेश पारकर सतीश सावंत यांच्या बाजुने उभे ठाकले आहेत. राज्यातील एकाच मतदारसंघात युती तुटल्याने आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. 

नारायण राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यास अडचणी येत होत्या. मात्र, भाजपाच्याच फॉर्मवर ते राज्यसभा सदस्य बनले. यानंतर लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, युतीमुळे ते सफल होऊ शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी नितेश राणेंना भाजपात प्रवेश देत उमेदवारी दिली. याविरोधात भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र, एकेकाळचे राणे यांचे कट्टर समर्थक असलेल्या आणि शिवसेनेत जात उमेदवारी मिळविलेल्या सतीश सावंतांना त्यांनी पाठिंबा देत उमेदवारी मागे घेतली. 

 

यावरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी संदेश पारकर यांना भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करा नाहीतर पक्षाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसेच संदेशचे वय किती असा सवालही केला होता. यावर संदेश पारकर यांनी जठार यांना प्रत्यूत्तर दिले. तुम्ही ज्या नितेश राणेंना अर्ज दिला त्यांचे भाजपातील वय काय असा प्रश्न विचारत जठारांना कणकवली नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळच्या घोषणेची आठवण करून दिली. नगरपरिषदेमध्ये पराभव झाल्यानंतर जठारांनी संदेश पारकर विधानसभेचा उमेदवार असेल, संदेशला निवडून आणेन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, जठार तुमचे शब्द विसरलात का, आता तुम्हाला राजकीय संन्यास घेण्याची गरज असल्याचा सल्लाही पारकर यांनी दिला. तसेच नितेश राणेंसाठी जीव देण्याची भाषा करत राणेंचे किती निष्ठावंत असल्याचे दाखवत असल्याचा आरोप केला. 

जठारांची 10 वर्षांतली भाषणे काढून पहा तफावत किती आहे...गेली तीन वर्षे मी भाजपामध्ये काम करत आहे. जठार यांची गेल्या 7-8 वर्षांतली भाषणे काढून पहा किती तफावत आहे ती. आजच्या भाषणांमध्ये ती दिसेल, असेही पारकर यांनी म्हटले. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरNitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाkankavli-acकणकवली