शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही

By admin | Updated: February 20, 2016 00:40 IST

सुनील पवार : शिवजयंतीचे औचित्य साधत कुडाळात रॅलीसह विविध कार्यक्रम

कुडाळ : हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करणे आपल्या सर्वांचे काम आहे. असा राजा पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन शिवराज्याभिषेक समिती किल्ले रायगडचे अध्यक्ष सुनील पवार यांनी शुक्रवारी केले. शिवजयंतीच्या निमित्ताने दुचाकी रॅलीने भगवामय वातावरण निर्मिती शहारात करण्यात आली.शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून मराठा समाज कुडाळच्यावतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिवप्रेमींनी भगवे फेटे बांधले होते. जय भवानी जय शिवाजी व हरहर महादेवाच्या नामघोषाने शहर परिसर दुमदुमला. शहरातील सावंत प्रभावळकरवाडा येथून मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. जिजामाता चौक येथे अ‍ॅड. निलांगी रांगणेकर यांच्या हस्ते जिजामाता पुतळ्यास तर शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुनील पवार, अ‍ॅड. सुहास सावंत, सुंदर सावंत यांनी पुष्पहार घातला. यावेळी मराठा समाजाचे संग्राम सावंत, गोविंद सावंत, बंड्या सावंत, डॉ. संदीप पाटील, लवू सावंत, रूपेश कानडे, प्रशांत राणे, विनायक राणे, सचिन सावंत, बापू सावंत, बंटी तुळसकर, विजय सावंत, नितीन सावंत, शिवराम सावंत, बाळा सावंत, शिवप्रेमी उपस्थित होते. मोटारसायकल रॅली शहर बाजारपेठ ते गांधीचौक अशी काढण्यात आली. यावेळी पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठा समाज हिंदू धर्मावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येकाचे काम आहे. हिंदुस्थानात असा राजा झाला नाही आणि पुढे होणे नाही. त्यांचे कार्य प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे. भविष्यात त्यांची पुढील जयंती ही दिमाखात विविध कार्यक्रमाने साजरी केली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)