आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा साताऱ्यात

By Admin | Updated: January 14, 2015 00:33 IST2015-01-13T23:05:27+5:302015-01-14T00:33:22+5:30

२२ ते २४ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे तसेच २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय

Intercollegiate oratory races in Satara | आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा साताऱ्यात

आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा साताऱ्यात

सिंधुदुर्गनगरी : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत २२ ते २४ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे तसेच २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट आॅफ सायन्स, सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘दिनदलितांसाठी अण्णा, तुमची झिजली चंदनकाया’, ‘जे सत्य, सुंदर, सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास घे’, ‘आम्ही सारे दाभोळकर’, ‘मी शेतकरी बोलतोय’, ‘स्मार्टफोन- शाप की वरदान’ आदी विषय देण्यात आले आहेत. प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, साहित्य व कला, भारताचा इतिहास, सामान्य विज्ञान, पर्यावरणविषयक सामान्य मुद्दे, विज्ञान तंत्रज्ञान, महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार व त्यांचे स्वरूप, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या प्रचलित घडामोडी, महाराष्ट्रातील समाजसुधारक, आॅडिओ व व्हिडिओ प्रश्न आदी विषय देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी रयत शिक्षण संस्थेच्या ६६६.१ं८ं३२ँ्र‘२ँंल्ल.ी४ि व ६६६.ी१ं८ं३.ङ्म१ॅ या संकेतस्थळांना भेट द्यावी. कर्मवीर विद्याप्रबोधिनी सातारा येथे संपर्क साधावा व वक्तृत्व स्पर्धेसाठी १८ जानेवारी रोजी व प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी २५ जानेवारी रोजीपर्यंत आपल्या प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन मुख्याध्यापक आर. के. शिंदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Intercollegiate oratory races in Satara