शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 27, 2023 18:07 IST

रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल

कुडाळ (सिंधुदुर्ग): रिफायनरी प्रकल्प किती चांगला आहे. तो बारसुला व्हावा असे लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना लिहीले होते. तेच ठाकरे आता या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांना लगावला. रिफायनरीला जेवढे विरोधक आहेत त्याही पेक्षा जास्त समर्थक आहेत असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्री पाय उतार झालेत, पण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर तळतळाट व थयथयाट करणारे देशाच्या राजकारणात ठाकरे हे पहीलेच आहेत.  मुख्यमंत्री पद गेल्याचे त्यांना खुप दु:ख झाले आहे, त्यांना नैराश्य आले असल्याचा टोला लगावला.कुडाळ विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज, गुरुवारी झाली. यावेळी रिफायनरी प्रकल्पाबाबत उदय सामंत यांनी सांगितले की,  रिफायनरी प्रकल्पाला नाणार येथे विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  हा प्रकल्प बारसु येथे व्हावा असे लेखी पत्र दि. १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले. या पत्रात त्यांनी, बारसु येथे कातळ जमीन आहे. हा प्रकल्प कोकणाच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी प्रदुषण होणार नाही, अशा प्रकारचे अनेक चांगले मुद्दे मांडले होते. आणि आता तेच विरोधात बोलत आहेत. स्थानिक आमदार साळवीचें समर्थनरिफायनरीला खासदार  विनायक राऊत विरोध करतात. आमदार वैभव नाईक बारसुला जावुन आले ते ही विरोध करतात. मात्र तेथील स्थानिक आमदार राजन साळवी समर्थन करतात. हे काही मला समजले नाही असा ही टोला सामंत यांनी लगावला.रिफायनरी प्रकल्पामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील लाखो युवकांना रोजगार मिळेल. विकासात्मक क्रांती होईल. रिफायनरी विरोधक आहेत त्यापेक्षा समर्थक आहेत. सध्या त्या ठिकाणी केवळ माती परिक्षण सुरू आहे. माती परिक्षणाला नंतरच त्या ठिकाणी प्रकल्प होईल. पण काहींनी तर आता लगेचच प्रकल्प सुरु होईल असा समज केला आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे