शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आचिर्णे, लोरेमध्ये हत्तींचा धुडगूस

By admin | Updated: November 23, 2014 00:39 IST

ग्रामस्थांमध्ये भीती : नेमणवाडीत घरात घुसून भात गोण्या तुडविल्या

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे व लोरे गावांत काल, शुक्रवारी रात्री दोन रानटी हत्तींनी धुडगूस घातला. दोन गावांतील ऊसशेती, नारळ बागा, केळी आदींची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत लोरे नेमणवाडीतील शेतकऱ्यांच्या घराचा दरवाजा तोडून भाताच्या गोण्या तुडविल्या. त्यामुळे रात्रभर संपूर्ण नेमणवाडी व दर्डेवाडी ही गावे दहशतीखाली होती. दरम्यान, आज, शनिवारी सकाळी दोन्ही हत्ती वाघेरी-डामरेकडे गेल्याचे वनविभागाने सांगितले.जिल्ह्यात १२ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या रानटी हत्तींनी मांडलेला उच्छाद शुक्रवारी रात्री पहिल्यांदाच लोरेतील शेतकऱ्यांनी अनुभवला. कणकवलीतील वाघेरी, घोणसरीतून शुक्रवारी दुपारी दोन रानटी हत्ती आचिर्णे घाणेगड परिसरात दाखल झाले होते. येथील गवताच्या गंजी हत्तींनी उद्ध्वस्त केल्या. तसेच लोरे सुतारवाडीतील कृष्णा मेस्त्री यांची ऊस शेती, रश्मी गुरव यांचा भुईमूग, देवयानी गुरव यांच्या केळी, नारळ झाडे, रताळींचे नुकसान केले. (प्रतिनिधी)नारळ बाग, ऊसशेती जमीनदोस्तलोरे नाचणेकरवाडीतील माळवदे या शेतकऱ्याची सुमारे अर्धा एकर ऊसशेती तुडवून जमीनदोस्त केली. तसेच गावातील अन्य शेतकऱ्यांच्या ऊसशेतीचे हत्तींनी नुकसान केले. येथील मधुकर विठोबा आग्रे यांच्या बागेतील सहा नारळाच्या झाडांची नासधूस केली. आचिर्णे व लोरेतील शेतकऱ्यांचे एका रात्रीत हत्तींनी लाखोंचे नुकसान केले.दारात हत्ती, घरात धडकीलोरे नेमणवाडीतील मनोहर बाबू दर्डे यांच्या घराच्या पुढील दरवाजावर रात्री ११.१५ वाजता हत्तीने धडक मारली, तेव्हा घरात ४ लहान मुलांसह ९ माणसे होती. हत्तीने घराचा पुढील दरवाजा तोडल्याने अंधारातच घरातील माणसांनी जीव वाचविण्यासाठी सर्व शक्ती एकवटून सुमारे २५ मिनिटे आतील दरवाजा आतून दाबून धरला होता. या काळात हत्तीने पडवीतील ६ ते ७ भाताच्या गोण्या सोंडेने अंगणात फेकून तुडवून नासधूस केली होती. तब्बल अर्ध्या तासानंतर हत्ती कुंपणाबाहेर गेल्यावर दर्डे कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.लोरेत रात्री हत्तींचे दर्शनशुक्रवारी रात्री लोरेतील काही शेतकऱ्यांना दोन रानटी हत्तींचे तीन ते चार ठिकाणी दर्शन झाले. हत्तींच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी हातात दांडके घेऊन रात्र जागविली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आचिर्णे, लोरेत फिरून हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी केली. सकाळी ११च्या सुमारास हत्ती कणकवली तालुक्यातील वाघेरी डामरे गावाकडे परतले.