शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी वनरक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 18:30 IST

ForestDepartment Crimenews Sindhudurga -कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह पाच वनाधिकारी व कर्मचारी यांच्यावर रविवारी रात्री ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार, त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देमारहाणप्रकरणी वनरक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल फोंडाघाट येथील घटना : संशयितांना एक दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह पाच वनाधिकारी व कर्मचारी यांच्यावर रविवारी रात्री ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानुसार, त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.कातकरी आदिवासी समाजातील व्यक्तींना वनरक्षकांनी केलेल्या मारहाणप्रकरणी ॲड. सुदीप कांबळे यांना अत्याचारित लोकांकडून माहिती मिळाली. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रमोद कासले, तालुकाध्यक्ष संजय जाधव यांना घेऊन फोंडाघाट येथे कातकरी आदिवासी यांची भेट घेतली होती. तसेच मारहाणीची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करून अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, शैलजा कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांना घेऊन ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी कणकवली पोलीस ठाण्यात केली होती.या मागणीनुसार कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी या घटनेचा सखोल तपास करून अत्याचारित कातकरी आदिवासी समाजातील व्यक्तींच्या तक्रारीनुसार रविवारी गुन्हे दाखल केले. त्यामध्ये संशयित आरोपी वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल यांचा समावेश आहे.या मारहाणप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरसकर, जिल्हा महिला संघटक गीतांजली कामत, कणकवली तालुका निरीक्षक निसार शेख यांनीही या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.तपासी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्यातील पाच जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी सर्व आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागKankavliकणकवली