शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

फोंडाघाटात घराला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 19:29 IST

प्रमिला भालेकर या घरात मोबाईलला रेंज नसल्याने शुक्रवारी रात्री घराबाहेर पडल्या. अंगणापुढे जाऊन त्या आपल्या मुलीला फोन करीत होत्या. त्याचवेळी अवघ्या पाच मिनिटांतच घरातून आगीचा लोळ येऊ लागल्याचे त्यांना दिसले.

ठळक मुद्देप्रमिला भालेकर या घरात मोबाईलला रेंज नसल्याने शुक्रवारी रात्री घराबाहेर पडल्या. अंगणापुढे जाऊन त्या आपल्या मुलीला फोन करीत होत्या. त्याचवेळी अवघ्या पाच मिनिटांतच घरातून आगीचा लोळ येऊ लागल्याचे त्यांना दिसले.

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट-भालेकरवाडी येथील प्रमिला अशोक भालेकर यांच्या घराला शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून घर बेचिराख झाले. यात घरासहीत रोख रक्कम, सोन्याचे दागिने व घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे भालेकर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रमिला भालेकर या घरात मोबाईलला रेंज नसल्याने शुक्रवारी रात्री घराबाहेर पडल्या. अंगणापुढे जाऊन त्या आपल्या मुलीला फोन  करीत होत्या. त्याचवेळी अवघ्या पाच मिनिटांतच घरातून आगीचा लोळ येऊ लागल्याचे त्यांना दिसले. याचवेळी बाजूच्या अजय भालेकर यांच्या पत्नीने हे दृश्य पाहताच कुटुंबीयांना तसेच  वाडीतील ग्रामस्थांना आग लागल्याचे सांगितले.
ग्रामस्थांनी धावाधाव करून आग आटोक्यात आणण्यास  सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत घराचे जंगली वासे, कौले, पत्रे, लाकडी दरवाजे, इलेक्ट्रीक  वायर,  बोर्ड यासह तांदुळ, धनधान्य, किमती वस्तू, शेगड्या, गॅस सिलिंडर, भांडी आदी वस्तू आगीत भस्मसात झाल्या आहेत.

प्रमिला भालेकर यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून या दुर्घटनेने त्यांना धक्काच बसला. या घटनेची माहिती समजताच पंचायत समिती सभापती सुजाता हळदिवे, सरपंच संतोष आग्रे, बबन हळदिवे, ग्रामसेवक चौकेकर, तलाठी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  

यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात २ लाख ९४ हजार ७०० रुपयांची हानी झाली असल्याचे म्हटले असले तरी हे नुकसान सुमारे ५  लाखांपर्यंत आहे. भालेकरवाडीतील ग्रामस्थांनी सुमारे पाऊणतास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. शनिवारी सकाळी तहसीलदार आर. जे. पवार व पोलिसांनी घटनेची पाहणी केली.


 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग