शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात डेंग्यूने केलीय शंभरी पार

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

१४ रुग्ण वाढले : आरोग्य विभाग झाला अधिकच सतर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. मात्र, यामध्ये एकही रुग्ण दगावलेला नाही. सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यात डेंग्यू या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग युध्दपातळीवर जनजागृती करीत आहे. तरीही गेल्या चार दिवसांमध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे १४ रुग्ण वाढल्याने आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे. घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले आहेत. डेंग्यू हा आजार दिवसा चावणाऱ्या एडिस ईजिप्ती या डासांपासून होतो. यामध्ये २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. त्यानंतर डोके दुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी लक्षणे उद्वतात. सन २०१३ या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात ११७ डेंग्यूचे रुग्ण होते. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंतची स्थिती पाहता आतापर्यंत डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांच्यावर आरोग्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्याकडून योग्य उपचार केले जात असल्याने त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होऊन ते घरी गेले आहेत. यातील काही रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. मात्र, डेंग्यूच्या आजाराने वर्षभरात जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)तालुकाडेंग्यूचे रुग्णमंडणगड०० दापोली०८ खेड०४ चिपळूण१०गुहागर१६संगमेश्वर२०रत्नागिरी३५लांजा०७ राजापूर०२एकूण१०२