शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

काम करायचे नसल्यास पदत्याग करा

By admin | Updated: November 22, 2014 00:06 IST

नारायण राणे : जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा

कणकवली : पक्ष संघटना वाढविण्यासाठी ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी पदे सोडून बाजूला व्हावे. प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. एका पराभवामुळे सर्व काही संपत नाही. त्यामुळे पराभवानंतर आता थांबू नका. जनतेच्या सेवेसाठी संघटितपणे कामाला लागा, असे आवाहन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. ओसरगाव येथील महिला भवन सभागृहात आज, शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आमदार नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पक्ष प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले नारायण राणे नेमके काय बोलणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे सभागृह खचाखच भरले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले, पराभवाविषयी मी काही बोलू इच्छित नाही. जिल्हा बँक निवडणुकीसाठी काम करापक्ष वाढविताना ज्यांना पक्षात काम करायचे नाही त्यांनी बाजूला व्हावे. पराभवामुळे माझा दरारा आणि आब कमी होणार नाही. मात्र, तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल हे लक्षात घ्या. विकासकामांसाठी ठामपणे जनतेच्या मागे कोण उभा राहतो, हे जनतेला समजेल. त्यामुळे पराभवानंतर थांबू नका. कार्यरत रहा. जिल्हा बँक निवडणुकीसाठी पक्षाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करा. निश्चितच विजय आपला असेल, असेही राणे यांनी सांगितले.