शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: October 6, 2014 22:34 IST

आरटीई कायदा : शिक्षण विभागाच्या आदेशाला स्थगिती

आनंद त्रिपाठी - वाटूळ---आरटीई कायद्यानुसार नुकत्याच झालेल्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडून संकलीत केली जात आहे. यामध्ये सगळ्यात कनिष्ठ शिक्षकाला अतिरिक्त ठरवण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिल्याने अनेक शाळांमधील नवे शिक्षणसेवक अतिरिक्त ठरत आहेत. त्यामुळे त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षण विभागाने २०१३-१४ च्या संचमान्यतेची कार्यवाही सुरु केली असून, विद्यार्थीसंख्येच्या निकषानुसार शिक्षकसंख्या निश्चित केल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. विशेषत: १३ फेब्रुवारी २०१३च्या शासन निर्णयानुसार सहावी ते आठवीसाठी पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करताना अतिरिक्त शिक्षकांमध्ये डीएड शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये नव्याने नियुक्त शिक्षणसेवकांवर मोठा अन्याय होत आहे.अतिरिक्त शिक्षणसेवकांचे अन्य शाळेमध्ये समायोजन न करता त्यांची सेवा समाप्त होत असल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षणसेवकांच्या नोकरीवर गदा येत आहे. कारण त्यांचा तीन वर्षांचा कालावधी सन २०१३-१४ मध्ये पूर्ण होत नाही, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. संबंधित निर्णय अन्यायकारक असल्याने बसणी येथील जी. एम. शेट्ये विद्यालयातील दोन शिक्षकांनी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्यावतीने अ‍ॅड. नरेंद्र बांदिवडेकर यांनी बाजू मांडून बसणी हायस्कूलच्या पंडित व तोडणकर यांच्या याचिकेवर स्थगिती आदेश दिला आहे. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे कोणी शिक्षणसेवक असतील तर त्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधावा. राज्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न चर्चेत आला असून, शाळांमधील काहीना याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. याबाबत गेले अनेक महिने शासनाशी चर्चा सुरू आहे. निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यानंतर स्थगितीचा आदेश देण्यात आला आहे.शिक्षण विभागाने २०१३-१४ला संचमान्यतेची कार्यवाही सुरू केली. विद्यार्थीसंख्या व शिक्षकांचे प्रमाण या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर वेळोवेळी चर्चा झाली. त्यानंतर उच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला. आता पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सन २०१३-१४ची संचमान्यता शिक्षणसेवकांवर अन्याय करणारी आहे. त्यांच्या नोकरीचे संरक्षण व्हावे, यासाठी शिक्षक परिषदेच्यावतीने आचारसंहितेच्या समाप्तीनंतर मोठे आंदोलन उभे केले जाणार आहे.- रामनाथ मोते, आमदार, कोकण विभाग आरटीई कायद्याची अंमलबजावणी अतिरिक्त शिक्षकांसाठी कसोटीपूर्ण.कनिष्ठ शिक्षकाला अतिरिक्त करण्याचे आदेश.२0१३-१४ ची संचमान्यता. शिक्षणसेवकांच्या नोकरीवर गदा की, त्यातून नवा पर्याय.निर्णय अन्यायकारक.