शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला कोठडी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:23 AM

मंगळवारी त्याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तो पडताळणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे.

सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील बागायत येथील एका व्यावसायिकाकडून सातशे रुपयांची लाच घेताना मसुरे पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर याला लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास रंगेहाथ पकडले होते. त्याला येथील जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तक्रारदार याच्या व्यवसायाशी संबंधित कायद्याचा धाक दाखवून नांदोसकर याने ही पैशाची मागणी केली होती.

 व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारताना नांदोसकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरा लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नांदोसकर याच्या कट्टा नांदोस येथील घरी जाऊन चौकशी केली.

याबाबतची तक्रार माळगाव बागायतवाडी येथील व्यापारी संजय लक्ष्मण खोत यांनी दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नितीन कुमार यांनी आपल्या सहकाºयांसह सापळा रचत ही कारवाई केली होती. पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी त्याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तो पडताळणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे. तसेच आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहे. त्यामुळे त्याची जंगम, स्थावर मिळकत तपासायची आहे. त्यामुळे पोलीस कोठडी मागितल्याचे जिल्हा सरकारी अभियोक्ता वकील संदेश तायशेटे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसMONEYपैसा