शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

कणकवलीत वाढदिवस सोहळ्यात कोरोना योद्धयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 6:51 PM

CoronaVirus Kankavli Sindhudurg : संदेश पारकर यांना समाजाबद्दल आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे ते जनतेवरील अन्यायाच्या विरोधात नेहमीच संघर्ष करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्यांना मानाचे पद मिळाले पाहिजे. ही आमची सर्वांची इच्छा आहे.त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा,त्यांना शिवसेनेत निश्चितच न्याय मिळेल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसंदेश पारकर यांना शिवसेनेत निश्चित न्याय मिळेल : उदय सामंतमान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली : संदेश पारकर यांना समाजाबद्दल आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे ते जनतेवरील अन्यायाच्या विरोधात नेहमीच संघर्ष करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्यांना मानाचे पद मिळाले पाहिजे. ही आमची सर्वांची इच्छा आहे.त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा,त्यांना शिवसेनेत निश्चितच न्याय मिळेल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात बुधवारी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कोरोना योध्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,नीलम पालव,राजू शेट्ये,बाळा भिसे, गीतेश कडू,शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, राजलक्ष्मी डिचोलकर,स्वरूपा विखाळे,संजय आंग्रे,विकास कुडाळकर,संतोष शिरसाठ,अनंत पिळणकर,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,विलास साळसकर,अवधूत मालणकर,संदेश सावंत- पटेल,अतुल बंगे, राजू राठोड,हर्षद गावडे,विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवसेनेत आल्यानंतर संदेश पारकर यांना पक्षात योग्य तो मान, सन्मान देण्यात येत आहे. त्यामुळे पारकर यांनी आता आहे तिथेच रहावे. भविष्यात त्यांना चांगले पद मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरवठा करेन.

पारकर यांच्याकडे पद असो वा नसो ते अविरतपणे सामाजिक कार्य करत राहतात. आजपर्यंत ते ज्या-ज्या पक्षात गेले तेथे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्यांची राज्यभर आदर्श नेते म्हणून ओळख आहे. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवावे. आमदार वैभव नाईक म्हणाले, संदेश पारकर यांच्याबद्दल जनतेच्या हृदयात आणि मनात आदराचे स्थान आहे. हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.अरुण दुधवडकर म्हणाले, राजकीय दहशतीच्या विरोधात लढणारे संदेश पारकर हे आहेत. राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी काही चुकीने निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पण आता शिवसेनेत आल्यानंतर त्यांना पक्षात योग्य मान, सन्मान मिळत असून भविष्यात त्यांना चांगल्या पदाची जबाबदारी सोपवली जाईल. यावेळी कोरोना काळात अविरत सेवेबद्दल डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका, वायरमन, पोलिस कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीSandesh Parkarसंदेश पारकरUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग