शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शतायु ग्रंथसंमेलन : अधिवेशनाच्या तयारीत चिपळूणकर गुंतले

By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST

चिपळूणच्या सुकन्या, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित राहणार

चिपळूण : चिपळूण येथे दि. ९ ते ११ जानेवारी २०१५ रोजी शतायु ग्रंथालये आणि ग्रंथकार यांचे अधिवेशन होत आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत असल्यामुळे अधिवेशनाच्या उद्घाटनाला चिपळूणच्या सुकन्या, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालयाचा शुभारंभ नुकताच झाला. विचारवंत व लेखक, समीक्षक प्रसिद्ध असलेले प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते २ आॅक्टोबर रोजी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून या अधिवेनाबद्दल प्रा. जोशी यांनी आनंद व्यक्त केला आणि अशा अधिवेशनांची गरज आणि महत्त्व अधोरेखित केले. वक्ता-श्रोता, लेखक-वाचक यांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथसेवक, ग्रंथपाल व ग्रंथालये करीत असतात. अनुदानात झालेली कपात, तरुणवर्गात सोशल मीडियामुळे वाचनाचा असलेला अभाव अशा अनेक समस्यांमुळे वाचनालये चालवणे कठीण झाले आहे. पुस्तकांची विक्री वाढते आहे. पण, त्यात उपयुक्त माहितीपर पुस्तकेच खपत आहेत. कथा, कविता, कादंबऱ्या अशा ललित वाङमयामुळे भावनांचा परिपोष होतो आणि सांस्कृतिक मूल्ये रुजतात. पण, अशी पुस्तके फार कमी विकत घेतली जातात. आई, वडील, आजोबा यांच्या हातात सतत पुस्तके दिसली तर मुलांवर वाचनाचे संस्कार होतात. पण किती पालक या जाणीवेने सभासद होतात? आज खऱ्या विचारवंतांची आणि कार्यकर्त्यांची वानवा आहे. विचारवंत जेव्हा कृतीहीन बनतात आणि कृतीवीर जेव्हा विचारहिन बनतात तेव्हा समाज स्वास्थ्य धोक्यात येते. आत्मियता असणारे ग्रंथपाल नवी पुस्तके स्वत: वाचतात व सभासदांना वाचायला प्रवृत्त करतात. पण, ग्रंथपालानाच जर पुरेसे वेतन वाचनालये देऊ शकत नसतील तर त्यांच्याकडून निष्ठेची, आत्मियतेची अपेक्षा कशी करणार? अशा अनेक प्रश्नांना एकत्रित सामोरे जाण्यासाठी अधिवेशनांची, व्यासपीठाची गरज आहे. साहित्य संमेलनाप्रमाणेच हे अधिवेशन होईल, अशी खात्री देऊन प्रा. जोशी यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.कार्यवाह प्रकाश काणे यांनी प्रस्तावना केली. अध्यक्ष अरविंद जाधव यांनी मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी गिरीधर साठे यांना पुणे मराठी गं्रथ संग्रहालय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला सुचय रेडीज, दुर्गे, दलितमित्र तात्या कोवळे, राष्ट्रपाल सावंत, डॉ. शारंगपाणी, मीनल ओक, अंजली बर्वे, महम्मद घारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण इंगवले यांनी केले व आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)