शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बार्जेस मच्छिमारांनी हुसकावल्या

By admin | Updated: December 28, 2014 00:12 IST

आरोंदा तेरेखोल खाडीतील प्रकार : मच्छिमार, कर्मचाऱ्यांत उडाली शाब्दीक चकमक

आरोंदा : सध्या गाजत असलेल्या आरोंदा बंदराबाबतचा वाद शनिवारी पुन्हा उफाळून आला. आरोंदा बंदरावर लावण्यासाठी दोन बार्ज दुपारच्या सुमारास गोवामार्गे आरोंदा तरेखोल खाडीत दाखल झाल्या होत्या. मात्र, स्थानिक मच्छीमारांशी या बार्जेसमधून आलेल्या कर्मचाऱ्यांची चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर मच्छीमारांनी या बार्जेस हुसकावून लावल्या. या दोन्ही बार्ज गोव्याच्या दिशेने रवाना झाल्या.याबाबत आरोंदा जेटी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी या बार्जेस विनापरवाना आल्या होत्या. या बार्जेसमध्ये देशविघातक साहित्य असले तर त्यांची तपासणी कोण करणार, सागरी सुरक्षा दल नावाला असल्याचा आरोप केला आहे.आरोंदा जेटीबाबतचा वाद सध्या गाजत आहे. त्यातच शुक्रवारी पालकमंत्री दीपक केसरकर यानी आरोंदा जेटीला भेट देत ग्रामस्थ तसेच संघर्ष समितीचे म्हणणे ऐकून घेतले तसेच याबाबतचा अहवाल मागवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीला चोवीस तासही उलटत नाही तोच शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गोवामार्गे दोन बार्जेस आरोंदा बंदर परिसरात आल्या. यावेळी मच्छीमारांनी या बार्जेसबाबत माहिती घेतली. यावेळी केरी तसेच आरोंदा येथील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी बार्जेसमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना जेटीबाबतची कागदपत्रे विचारण्यात आली. मात्र, एकही कागदपत्र ते सादर करू शकले नाहीत. या बार्जेसमधील कर्मचारी गोव्याच्या भाषेत बोलत होते. त्यामुळे या बार्जेस गोवा वास्को येथून आल्या असाव्यात, अशी शंका मच्छीमारांनी व्यक्त केली मात्र, दुपारच्या सुमारास या बार्जेस समुद्रात लावण्यात आल्या. त्यावेळी त्यातील कोणतेही सामान बाहेर काढण्यात आले नाही.या घटनेनंतर मच्छीमार संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, सुधाकर नाईक, बाळा आरोंदेकर यांनी बंदर परिसराला भेट दिली. आणि मच्छीमारांकडून माहिती घेतली असता त्यांनी झालेला प्रकार कथन केला.दरम्यान, अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी सागरी पोलीस तसेच कस्टम कार्यालयावर गंभीर आरोप केले असून जर समुद्रातून विनापरवाना एखादी बार्ज आली तर त्याची चौ कशी कशी काय करण्यात येत नाही. देशात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या बार्जेसमध्ये जर दहशतवादी कृत्ये करण्याचे सामान असेल तर काय करणार, असा सवाल उपस्थीत केला.याबाबत आम्ही तक्रार करणार असून एकतरी पोलीस कायमस्वरूपी बंदर परिसरात ठेवण्यात यावा. कोण काय घेउन येत आहे, याची माहिती घ्यावी, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)