शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, चक्क नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नाॅट रिचेबल, पाच जागांवर निवडणूक लढविण्याची नामुष्की

By अनंत खं.जाधव | Updated: November 18, 2025 09:26 IST

Sawantwadi Election: एकीकडे महायुती मध्ये वादाची ठिणगी पडलेली असतनाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फूट पडल्याचे दिसून आले.

सावंतवाडी -  एकीकडे महायुती मध्ये वादाची ठिणगी पडलेली असतनाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी फूट पडल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार उल्का वारंग व त्यांचे पती व विधानसभा प्रमुख उमाकांत वारंग यांनी ऐनवेळी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवली.

त्यामुळे अवघे पाच उमेदवारांचे अर्ज भरून राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे महायुती होणार की नाही?, याबाबत अद्याप माहित नाही परंतु आम्ही पाच उमेदवार घेऊन स्वबळावर लढू आणि निवडू. आम्ही पाच जण पन्नास जणांना भारी आहोत, असा दावा तालुकाप्रमुख उदय भोसले यांनी केला आहे.

सावंतवाडीत मागील आठवडय़ात राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला होता.त्यामुळे सावंतवाडीत चौरंगी लढत होणार हे निश्चित होते पण एकीकडे राष्ट्रवादी कडून उमेदवार उभे करण्याची चाचपणी सुरू असतनाच दुसरीकडे मात्र महायुती मधील नेत्यांशी उमाकांत वारंग याच्या माध्यमातून बोलणी सुरू होती.असे असतनाच आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वारंग यांनी नगराध्यक्ष पदासह अन्य उमेदवार नगरपरिषद मध्ये आले नसल्याने राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा गोंधळ उडाला आणि अवघे पाच जण राहिले मग त्यानीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यात प्रभाग नऊ अगस्तीन फर्नांडिस प्रभाग सहा उदय भोसले, दिशा कामत प्रभाग आठ रंजना निर्मल प्रभाग दहा सत्यवान चेंदवणकर यांनी यावेळी  आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यावेळी भोसले म्हणाले, या ठिकाणी आम्ही फक्त लढण्यासाठी उभे राहिलो आहोत. महायुती होणार की नाही?, याबाबत अद्यापपर्यंत माहिती नाही. तरीही आम्ही स्वबळावर लढणार. आम्ही पाच जण पन्नास जणांना भारी आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांना सामोरे जाणार आहोत. काही झाले तरी या ठिकाणी जास्तीत-जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वारंग यांच्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, अद्यापपर्यंत आपल्याला काही समजले नाही. 
त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले होते. परंतु त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांचा मोबाईल नोटरीचेबल होता. त्यामुळे नेमके काय झाले?, हे आपण त्यांच्याशी भेटून चर्चा करू. नंतरच आपल्याला ते कळेल. तोपर्यंत आपण तूर्ताच काहीच बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Split in Ajit Pawar's NCP in Sawantwadi; Candidate unreachable.

Web Summary : Sawantwadi NCP faces a split as the Nagaradhyaksha candidate withdraws at the last minute. Only five candidates filed nominations. Despite this, the party confidently stated they will contest independently.
टॅग्स :SawantwadiसावंतवाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक