शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा निधी करपला, बांधकाम मात्र मजबूत

By admin | Updated: December 30, 2015 00:46 IST

जिल्हा परिषद : २३ कोटींचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या सन २०१५-१६च्या २३ कोटी ११ लाख ५६ हजार ८२२ रुपये इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, या अंदाजपत्रकामध्ये पशुसंवर्धन व कृषी विभागासाठी गतवर्षीपेक्षा कमी तरतूद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. पाणी, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता आहे. हे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेचे वित्त सभापती व अध्यक्ष जगदीश राजापकर यांनी सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर सादर केले. सन २०१५-१६च्या मूळ अंदाजपत्रकामध्ये १ एप्रिल २०१५ रोजीच्या आरंभीची शिल्लक ८१ लाख ८५१ रुपये होती. परंतु, २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष जमा रक्कम व खर्चाचा विचार करता आरंभीची शिल्लक ११ कोटी १३ लाख १५ हजार ४७६ एवढी रक्कम विचारात घेऊन २३ कोटी ११ लाख ५६ हजार ९२२ रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. या अंदाजपत्रकामध्ये शिक्षण विभागासाठी १ कोटी ४ लाख ५ हजार, बांधकामसाठी २ कोटी ५ लाख २० हजार रुपये, आरोग्यासाठी ९ लाख २० हजार रुपये, कृषी विभाग १ कोटी ३४ लाख ४०० रुपये, पशुसंवर्धन विभाग ७६ लाख ७० हजार रुपये, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या २० टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी अनुशेषासह ५ कोटी ८६ लाख ८१ हजार ९२८ रुपये, पाणी व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ५३ लाख ९० हजार रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी १० टक्के अनुशेषासह १ कोटी ७४ लाख, अपंग कल्याणकारी योजनेसाठी ३ टक्केप्रमाणे ६६ लाख ९ हजार रुपये, अध्यक्ष या लेखाशीर्षकाखाली ८५ लाख ५२ हजार रुपये असे विविध विभागांसाठी अंदाजपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)भरीव तरतुदीची आवश्यकताया अंदाजपत्रकामध्ये टंचाई आणि सेससाठी जास्तची तरतूद केलेली नाही. तसेच बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद होणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाचे २ कोटी ३ लाख रुपयांचे दायित्व आहे. त्यामुळे या तरतूद केलेल्या रकमेनुसार एकही काम नव्याने घेता येणार नाही. त्यामुळे पाणी, बांधकाम विभागासाठी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता होती, असे उदय बने यांनी सभागृहात स्पष्ट केले. तरतूद कमी : कृषी विभागाच्या सर्व योजना शासनाकडे वर्गजिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभागावर अवकृपा दाखवण्यात आली आहे. यामध्ये कृषी विभाग १ कोटी ३४ लाख ४०० रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी ती मागील तरतूदीपेक्षा ३४ लाख ४०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. तसेच पशुसंवर्धन विभाग ७६ लाख ७० हजार रुपये ही तरतूद कमीच आहे. मागील अंदाजपत्रकाच्या तरतुदीपेक्षा २६ लाख ७० हजारांनी ती कमी केल्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने कसे चालविणार, असा प्रश्न शेवडे यांनी उपस्थित केला. कृषी विभागाच्या सर्वच योजना शासनाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे करण्यात आलेली तरतूद कमी असून, त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे पशुसंवर्धन, कृषी समिती सभापती व उपाध्यक्ष सतीश शेवडे सांगून त्यांनी नाराजी व्यक्त केली.