शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न

By admin | Updated: September 29, 2015 23:57 IST

पोलिसांनी पकडले : सावंतवाडीतील प्रकार

सावंतवाडी : पोटगीच्या गुन्ह्यात न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यामुळे फरार झालेल्या इन्सुली येथील संदीप लक्ष्मण सावंत (वय ३५) याला बांदा पोलिसांनी डेगवे येथून पकडले. मात्र, न्यायालयाच्या आवारात पाणी पिण्याच्या बहाण्याने न्यायालयातून त्याने पलायन केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलीस व नागरिकांनी सबनीसवाडा भागात त्याला पकडले व न्यायालयासमोर हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदीपने दोन विवाह केले आहेत. पहिल्या पत्नीला सोडल्याने तिने संदीपविरोधात येथील न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्या दाव्याप्रकरणी न्यायालयाने त्याच्यावर अटक वॉरंट बजावले होते. दरम्यान, संदीप हा डेगवे येथे असल्याचे बांदा पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांनी तेथून मंगळवारी त्याला ताब्यात घेतले व येथील न्यायालयात हजर केले. सुनावणीची वेळ दुपारनंतर असल्याने संदीपला घेऊन पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश पावस्कर न्यायालयाच्या आवारात उभे होते. त्याचवेळी संदीपने पाणी पिण्याचा बहाणा करत न्यायालयाच्या गेटवरून उडी मारून पलायन केले. ते पाहताच हेडकॉन्स्टेबल पावस्कर व जी. डी. सावंत यांनी त्याचा पाठलाग केला. नागरिकांच्याही हे लक्षात येताच त्यांनी संदीपला सबनीसवाडा येथील ओंकार सोसायटीजवळ पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी आरोपी पळाला नसून त्याला पकडल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)