शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात १० हजार जनजागृती पत्रके

By admin | Updated: January 13, 2015 00:15 IST

पल्स पोलिओ : नगरपरिषद आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम, घरोघरी प्रबोधन

चिपळूण : येथील नगर परिषद आरोग्य विभागातर्फे प्रभागात २९ ठिकाणी पल्स पोलिओ बूथ उघडण्यात येणार असून, १८ रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना डोस दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत १० हजार जनजागृती पत्रकांचे घरोघरी वाटप करण्यात आले आहे. पोलिओ निर्मुलनासाठी नगर परिषद आरोग्य विभागातर्फे दि. १८ व २२ फेब्रुवारी या दरम्यान ० ते ५ वयोगटातील मुलांना पल्स पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.शहर परिसरात नगर परिषद दवाखाना, खेंड मराठी शाळा, परांजपे मोतीवाले हायस्कूल, मापारी मोहल्ला उर्दू शाळा, उक्ताड गणपती मंदिर, गोवळकोट मराठी शाळा, गोवळकोट उर्दू शाळा, भोईवाडा शाळा, आफ्रीन पार्क, गोवळकोट रोड, विठ्ठल मंदिर साळी समाज, पेठमाप मराठी शाळा, कन्या शाळा केदार मंदिर-राम मंदिर, महाराष्ट्र हायस्कूल, मुरादपूर मराठी शाळा, वडार कॉलनी शाळा, बहादूरशेख आॅक्ट्राय नाका, बांदल हायस्कूल, रावतळे मराठी शाळा, ओझरवाडी शाळा, शिवाजीनगर एस. टी. बसस्थानक, युनायटेड इंग्लिश स्कूल, पाग बौद्धवाडी, पाग मराठी शाळा, कृष्णेश्वर मंदिर कैलास भवन पाग, पाग गोपाळकृष्णवाडी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच फिरते पथक यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील डोसही बालकांना त्याच केंद्रावर दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य समिती सभापती रुक्सार अलवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिती शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कांचन मदार आदींसह प्रभागातील सर्व नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)