Corona vaccine-जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:50 PM2021-05-14T17:50:47+5:302021-05-14T17:53:09+5:30

Corona vaccine sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

1 lakh 19 thousand 518 citizens took the first dose in the district | Corona vaccine-जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी घेतला पहिला डोस

Corona vaccine-जिल्ह्यात १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी घेतला पहिला डोस

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी घेतला पहिला डोस आतापर्यंत १ लाख ६३ हजार ९३० लसी प्राप्त

सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख १९ हजार ५१८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

यामध्ये एकूण ९ हजार ४६२ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ६ हजार ५५४ जणांनी दुसरा डोस घेतला. ७ हजार ६१७ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ३ हजार ९२३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षांवरील ५१ हजार ८८५ व्यक्तींनी पहिला डोस तर १९ हजार ३३५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील ३८ हजार १०२ नागरिकांनी पहिला डोस तर ४ हजार १३० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील १२ हजार ४५२ जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण १ लाख ५३ हजार ४६० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण १ लाख ६३ हजार ९३० लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये १ लाख २७ हजार ४८० लसी या कोविशिल्डच्या, तर ३६ हजार ४५० लसी या कोव्हॅक्सिनच्या आहेत. तर १ लाख १८ हजार १५१ कोविशिल्ड आणि ३५ हजार ३०९ कोव्हॅक्सिन असे मिळून १ लाख ५३ हजार ४६० डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण १ हजार ७२० लसी असून त्यापैकी १ हजार ५६० कोविशिल्डच्या तर १६० कोव्हॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ८०० कोविशिल्डच्या लसी शिल्लक आहेत.

Web Title: 1 lakh 19 thousand 518 citizens took the first dose in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.