सखी: लहान मुलांचे केस अकाली पांढरे? डॉक्टरांनी सांगितली कारणे आणि उपाय.
लहान मुलांचे केस अकाली पांढरे होणे किंवा गळणे हे पोषक तत्वांची कमतरता, आनुवंशिकता, ताण, हार्मोनल असंतुलन असू शकते. डॉक्टरांनी संतुलित आहार, पुरेशी झोप, स्क्रीन टाइम कमी करणे आणि सौम्य शाम्पू वापरण्याचा सल्ला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर: मोबाईल हॅक, साडेसहा लाखांची चोरी: ओटीपीशिवाय खाते झाले साफ
वाळूजमध्ये मोबाईल हॅक करून ओटीपीशिवाय बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डद्वारे तब्बल ₹६.७७ लाखांची चोरी. नितीन पवार यांनी तक्रार दाखल केली, ज्यामुळे सायबर सुरक्षा धोक्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राष्ट्रीय: रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी घेतली PM मोदींची भेट
लावरोव्ह यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली; युक्रेन, पश्चिम आशिया, तेल संकट, द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. मोदींनी संवादावर भर दिला. लावरोव्ह यांनी पुतिन यांच्या भेटीनंतरच्या प्रगतीची माहिती दिली व ब्रिक्सवर चर्चा झाली.
क्रिकेट: IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
IPL स्पर्धेसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला बीसीसीआयकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. भारत-श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारतीय 'अ' संघात त्याची निवड झाली आहे. BCCI नं तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघ निवडला आहे. भारतीय वरिष्ठ संघात एन्ट्री मारण्यासाठी हा दौरा वैभव सूर्यवंशीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
व्यापार: ४२ तासांत २,८४३ किमीचा प्रवास; 'ही' आहे भारतातील सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस...
भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील 'राजधानी एक्सप्रेस' ही तिच्या वेगवान प्रवासासाठी आणि आलिशान सुविधांसाठी ओळखली जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? देशात एक अशीही राजधानी एक्सप्रेस आहे, जी अंतर आणि वेळ या दोन्ही बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित करते. उत्तर भारताला थेट दक्षिण भारताशी जोडणारी ही रेल्वे म्हणजे 'तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस'. भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारी ही रेल्वे देशातील सर्वात लांब पल्ल्याची राजधानी एक्सप्रेस आहे.
हिंगोली: लाचखोरी भोवली: घरकुल लाभार्थ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
सेनगावमध्ये घरकुल योजनेतील स्वाक्षरीसाठी ग्रामसेवकाने लाच मागितली. तक्रारीनंतर एसीबीने गोरेगाव चौफुली येथे सापळा रचून ग्रामसेवकाला अडीच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. स्वाक्षरीसाठी लाभार्थ्याला त्रास देत होता.
व्यापार: जिओमध्ये नेतृत्व बदल: आकाश अंबानी यांच्याकडे कंपनीची मोठी जबाबदारी.
जिओच्या संभाव्य IPO पूर्वी, आकाश अंबानी यांची ५ वर्षांसाठी जिओ प्लॅटफॉर्म्सच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे. यापूर्वी ते रिलायन्स जिओचे अध्यक्ष होते. जिओच्या डिजिटल वाटचालीतील महत्त्वाचा निर्णय.
व्यापार: महागाईचा भडका! घाऊक महागाई ४२ महिन्यांच्या उच्चांकावर, तेल दरवाढीचा परिणाम
भारतात महागाईनं पुन्हा एकदा डोकं वर काढले असून एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये घाऊक महागाईचा दर ८.३% वर पोहोचला आहे. गेल्या ४२ महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर असून पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे याचं मुख्य कारण आहे.
महाराष्ट्र: पुन्हा नीट परीक्षा: पेपरफुटी होणार नाही याची हमी कोण देणार?
वारंवार पेपरफुटीमुळे नीट-यूजी २०२६ च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह. परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.जेईई प्रमाणे ऑनलाइन परीक्षा झाल्यास भ्रष्टाचार थांबेल,असे मत व्यक्त होत आहे.
व्यापार: गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी; CCI ची मंजुरी, किती कोटीत झाला करार..?
दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदाणी समूहाने ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली आहेत. 'जेपी असोसिएट्स'नंतर आता दिवाळखोर झालेली 'जीव्हीके एनर्जी लिमिटेड' (GVK Energy Limited) खरेदी करण्याचा मार्ग अदाणी समूहासाठी मोकळा झाला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) या १००% अधिग्रहणाला हिरवा कंदील दिला आहे.
व्यापार: केविन वॉर्श अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष; महागाई कमी करण्याचं आव्हान
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या 'फेडरल रिझर्व्ह'मध्ये मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. बुधवारी, १३ मे रोजी अमेरिकन सिनेटमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण मतदानानंतर केविन वॉर्श यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्थेच्या मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व आता वॉर्श यांच्याकडे असेल. व्याजदर आणि वाढती महागाई यांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं असताना ही नियुक्ती झालीये.
छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानी गुंडा भट्टीशी संपर्क; छ. संभाजीनगरमधील तरुणांची एटीएस चौकशी
शहजाद भट्टी या पाकिस्तानी गुंडाशी कथित संबंधांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील 13 तरुणांची एटीएस चौकशी करत आहे. भट्टी सोशल मीडियाद्वारे तरुणांना देशविरोधी कामांसाठी फसवतो. महाराष्ट्रभर छापे टाकून भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
व्यापार: ५.३ अब्ज डॉलर्सच्या ऑर्डर, शेअर ३२% ने वाढला; तरीही 'या' कंपनीने ४,००० कर्मचाऱ्यांना दिला नारळ
नेटवर्किंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी सिस्को (Cisco) कडून एक मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीने आपल्या पुनर्रचना धोरणाचा भाग म्हणून सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक असली, तरी गुंतवणूकदारांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे, या घोषणेनंतर सिस्कोच्या शेअर्समध्ये १६% हून अधिक वाढ पाहायला मिळाली.
हिंगोली: दारुड्या मुलाला आई-भावाने संपवले; सततच्या त्रासाला कंटाळले.
हिंगोलीत आई व भावाने दारुड्या मुलाला सततच्या त्रासाला कंटाळून मारले. त्यांनी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण शवविच्छेदनात सत्य उघड झाले. दोघांनाही अटक, खुनाचा गुन्हा दाखल.
व्यापार: डॉलरच्या तुलनेत रुपयाची रेकॉर्ड घसरण, ९६ च्या जवळ पोहोचला
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सध्या रुपयाच्या घसरणीचं मोठं संकट उभं राहिलं आहे. गुरुवारी, १४ मे रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय रुपयानं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री आणि मध्य पूर्वेतील वाढता तणाव यामुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
व्यापार: या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
कॅरिबियन देश क्युबा सध्या इतिहासातील सर्वात भीषण ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. देशातील पेट्रोल-डिझेलचा साठा जवळजवळ संपला असून, राजधानी हवानासह संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक भागांत नागरिकांना दिवसातील २० ते २२ तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. क्युबाचे ऊर्जा मंत्री व्हिसेंट डी लाओ यांनी सरकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना या धक्कादायक परिस्थितीची कबुली दिली आहे.
पुणे: 'तो' नेमका कोण ? हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवणारा आरोपी CCTV मध्ये कैद
पुणे : हडपसर परिसरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता संशयित आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो इलेक्ट्रिक स्कूटरवरून रुग्णालयात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने अतिदक्षता विभागाच्या (ICU) शेजारील पुरुष स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
राष्ट्रीय: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
हिंदू धर्म ही एक जीवनशैली असल्याचे निरीक्षण नोंदवत, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, हिंदू राहण्यासाठी एखाद्या हिंदू व्यक्तीने मंदिरात जाणे किंवा कोणताही विधी करणे अनिवार्य नाही. आपली श्रद्धा सिद्ध करण्यासाठी घरात दिवा लावणेदेखील पुरेसे आहे.
व्यापार: पेट्रोल, डिझेलची दरवाढ होणार? आरबीआय गव्हर्नर यांचे दरवाढीचे संकेत
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिलेत की, जर पश्चिम आशियातील संकट दीर्घकाळ सुरू राहिलं, तर सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करावी लागू शकते. त्यांच्या या विधानामुळे सर्वसामान्य नागरिक आणि बाजारपेठ दोघांचीही धाकधूक वाढली आहे.
व्यापार: कंपनीचा नफा ३४ टक्क्यांनी घटला, तरीही गुंतवणूकदारांची चांदी! मिळणार भरघोस लाभांश
Airtel Q4 Results: देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी Bharti Airtel ने १३ मे रोजी मार्च २०२६ च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा ३४ टक्क्यांनी घटलेला दिसत असला, तरी कंपनीने आपल्या भागधारकांसाठी २४ रुपये प्रति शेअर इतका बंपर लाभांश जाहीर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
करिअर: भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
Indian Air Force Notification 2026 : भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. वायुसेनेने AFCAT-2 अधिसूचना २०२६ प्रसिद्ध केली असून, याद्वारे फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल व नॉन-टेक्निकल) पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी स्त्री आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
व्यापार: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ
मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो वाहनधारकांसाठी चिंतेची बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.
व्यापार: मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
India LPG Tanker: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसने भरलेल्या 'एमव्ही सनशाईन' या जहाजाने अत्यंत संवेदनशील मानली जाणारी 'होर्मुझची सामुद्रधुनी' सुरक्षितपणे पार केली असून, आता हे जहाज भारताच्या दिशेने रवाना झाले आहे.
राष्ट्रीय: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. बुधवारी सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे.
मुंबई: Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार?
मुंबई : म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी कमी संख्येने अर्ज आले असून, घरांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा आहेत. परिणामी अधिकाधिक संख्येने अर्ज यावे याकरिता म्हाडावर २ हजार ६४० घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली. आता या मुदतवाढीनुसार, २८ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी व अर्ज करता येईल.
क्रिकेट: Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
रायपूरच्या मैदानातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीनं आयपीएल कारकिर्दीतील ९ वे शतक झळकावले. सलग दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर दमदार कमबॅक करताना शतकी खेळीसह विराट कोहलीनं या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा पल्लाही गाठला. सर्वात जलदगतीने हा डाव साधणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीनं ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
व्यापार: अमूलनंतर मदर डेअरीचाही दणका! दुध महागलं, नवे दर जाहीर
अमूलनंतर मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. नवीन दर १४ मे २०२६ पासून लागू. टोकन दूध आता ५८ रुपये, फुल क्रीम ७२ रुपये, टोन्ड दूध ६० रुपये. डबल टोन्ड ५४ रुपये, गाईचे दूध ६२ रुपये आणि प्रो-मिल्क ७२ रुपये दराने मिळेल.
क्रिकेट: विराट कोहलीने मोडला MS धोनीचा IPL विक्रम; सर्वाधिक सामने खेळले.
क्रिकेट जगतातील महान फलंदाज विराट कोहली याने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा MS धोनीचा सर्वकालीन विक्रम मोडीत काढत कोहली इथंही किंग ठरला आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर मैदानात उतरताच सर्वाधिक सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत किंग कोहलीनं MS धोनी आणि रोहित शर्मा या दोघांना मागे टाकले.
राष्ट्रीय: एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; कारण काय?
जेट इंधनाचे दर आणि हवाई निर्बंधांमुळे एअर इंडियाने ऑगस्ट २०२६ पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे कमी केली आहेत. अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया मार्गावरील उड्डाणे प्रभावित झाली आहेत. काही मार्ग तात्पुरते रद्द किंवा कमी करण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर हजारो उड्डाणे रद्द आणि विलंबाने सुरू आहेत.
व्यापार: महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! ग्राहकांवर काय परिणाम?
अमूलने १४ मे, २०२६ पासून देशभरात दुधाच्या दरात २ रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. उत्पादन आणि संचालन खर्च वाढल्याने, विशेषत: पशुखाद्य आणि पॅकेजिंगमध्ये वाढ झाल्याने हे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांनाही खरेदी दरात वाढ झाल्याचा फायदा होईल. यापूर्वी १ मे, २०२५ रोजी दरवाढ झाली होती, ज्यामुळे घरगुती बजेट आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींवर परिणाम होईल.
छत्रपती संभाजीनगर: सुट्टीसाठी घरी आलेल्या दोन भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
सिल्लोडमधील शिवनाजवळील एका शेततळ्यात 10 आणि 12 वर्षांच्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ते बोर्डिंग स्कूलमधून उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी घरी आले होते, तेव्हा ही दुःखद घटना घडली. हे मुलगे स्थानिक मेंढपाळ रामदास साबळे यांचे होते. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.