Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी; CCI ची मंजुरी, किती कोटीत झाला करार..?

गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी; CCI ची मंजुरी, किती कोटीत झाला करार..?

Adani Group: अलिकडेच अदानी समूहाने जेपी असोसिएट्सचे अधिग्रहण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:36 IST2026-05-14T14:34:44+5:302026-05-14T14:36:11+5:30

Adani Group: अलिकडेच अदानी समूहाने जेपी असोसिएट्सचे अधिग्रहण केले आहे.

Adani Group: Another company will join Gautam Adani's fleet; CCI approval, how many crores of contract was signed..? | गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी; CCI ची मंजुरी, किती कोटीत झाला करार..?

गौतम अदानींच्या झोळीत येणार आणखी एक कंपनी; CCI ची मंजुरी, किती कोटीत झाला करार..?

Adani Group: दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदाणी समूहाने ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात आपले वर्चस्व वाढवण्याच्या दिशेने मोठी पावले उचलली आहेत. 'जेपी असोसिएट्स'नंतर आता दिवाळखोर झालेली 'जीव्हीके एनर्जी लिमिटेड' (GVK Energy Limited) खरेदी करण्याचा मार्ग अदाणी समूहासाठी मोकळा झाला आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) या १००% अधिग्रहणाला हिरवा कंदील दिला आहे.

जीव्हीके एनर्जीचे १००% अधिग्रहण

अदानी पॉवरने जीव्हीके एनर्जी लिमिटेडच्या संपूर्ण मालकीसाठी बोली लावली होती. १२ मे रोजी सीसीआयने या प्रस्तावाला मंजुरी दिली. इन्सॉल्वेंसी अँड बँकरप्सी कोड (IBC), २०१६ अंतर्गत कॉर्पोरेट इन्सॉल्वेंसी रिझोल्यूशन प्रोसेसद्वारे हे अधिग्रहण पार पडणार आहे.

दरम्यान, ६ मे २०२५ रोजी कर्जदारांनी डिफॉल्ट केल्यामुळे या कंपनीविरोधात आयबीसीच्या कलम ७ अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली होती. १० जुलै २०२५ रोजी बोलीदारांकडून 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' मागवण्यात आले होते. 

अदानी पॉवरसह इतरही अनेक कंपन्यांनी कंपनीवर बोली लावली आहे. सध्या भागधारकांची समिती (CoC) यावर विचार करत आहे. नियमानुसार, CoC च्या मतदानापूर्वी सीसीआयची मंजुरी आवश्यक असते, जी आता अदानी समूहाला मिळाली आहे.

जेपी असोसिएट्सचे अदानींच्या ताफ्यात

दुसरीकडे, जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड खरेदी करण्याची महत्त्वाची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. यामुळे जेपी समूहाच्या मालकी हक्काची कागदोपत्री प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. अदानी समूहाने जेपीसाठी तब्बल १४,५३५ कोटी रुपयांची बोली लावली होती. विशेष म्हणजे, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहाने १६,७२६ कोटी रुपयांची मोठी बोली लावली असतानाही, बँकांनी अदानींच्या 'रिझोल्यूशन प्लॅन'ला पसंती दिली.

अदानी समूहाचा पेमेंट प्लॅन हा अधिक विश्वासार्ह असून ते कर्जदारांना वेदांताच्या तुलनेत लवकर पैसे देणार आहेत. यामुळे बँकांनी अदानींच्या प्रस्तावाला प्राधान्य दिले. तज्ज्ञांचे मते, अदानी समूहाची ही दोन मोठी अधिग्रहणे भारताच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारी ठरू शकतात. जीव्हीके एनर्जी आणि जेपी असोसिएट्सच्या समावेशामुळे अदानी पॉवरची वीज निर्मिती क्षमता आणि बाजारपेठेतील हिस्सा लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

Web Title : सीसीआई की मंजूरी के बाद अडानी समूह जीवीके एनर्जी का अधिग्रहण करने के लिए तैयार

Web Summary : सीसीआई की मंजूरी के बाद अडानी समूह जीवीके एनर्जी का अधिग्रहण करने के लिए तैयार है, जिससे उसका ऊर्जा और बुनियादी ढांचा पोर्टफोलियो मजबूत होगा। उन्होंने जयप्रकाश एसोसिएट्स के लिए ₹14,535 करोड़ की बोली भी जीती, जिन्हें वेदांता की तुलना में अधिक विश्वसनीय भुगतान योजना के कारण चुना गया। इन अधिग्रहणों से अडानी पावर की बाजार हिस्सेदारी में काफी वृद्धि होगी।

Web Title : Adani Group Set to Acquire GVK Energy After CCI Approval

Web Summary : Adani Group is poised to acquire GVK Energy after CCI approval, strengthening its energy and infrastructure portfolio. They also won bid for Jaiprakash Associates for ₹14,535 crore, chosen over Vedanta due to a more reliable payment plan. These acquisitions significantly boost Adani Power's market share.