घरकुल लाभार्थीची अडवणूक महागात; लाच स्वीकारताना ग्रामसेवक एसीबीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:40 IST2026-05-14T15:38:55+5:302026-05-14T15:40:44+5:30

घरकुलाच्या सहीसाठी मागितली लाच! ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; सेनगावमधील कारवाई

Gram Sevak Caught Red-Handed by ACB in Sengaon; Accepted Bribe for Gharkul Project Signature | घरकुल लाभार्थीची अडवणूक महागात; लाच स्वीकारताना ग्रामसेवक एसीबीच्या ताब्यात

घरकुल लाभार्थीची अडवणूक महागात; लाच स्वीकारताना ग्रामसेवक एसीबीच्या ताब्यात

सेनगाव (जि. हिंगोली): घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सवना येथील ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धाडसी कारवाई बुधवार, १३ मे रोजी दुपारी गोरेगाव चौफुली येथे करण्यात आली.

नेमका प्रकार काय?
सवना येथील एका लाभार्थ्याला शासकीय घरकूल मंजूर झाले होते. या प्रक्रियेचा भाग म्हणून घराच्या पाहणीचा अहवाल पुढे पाठवण्यासाठी ग्रामसेवकाच्या स्वाक्षरीची गरज होती. तक्रारदाराने अनेकवेळा विनंती करूनही ग्रामसेवक खिल्लारी स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत होते. शेवटी या कामासाठी त्यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, ज्यामध्ये अडीच हजार रुपयांची तडजोड झाली.

गोरेगाव चौफुलीवर सापळा
तक्रारदाराने या मागणीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानुसार एसीबीने गोरेगाव चौफुली परिसरात सापळा रचला. दुपारी जेव्हा खिल्लारी यांनी लाचेची रक्कम स्वीकारली, तेव्हा दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना जाळ्यात पकडले.

Web Title : घूसखोरी अधिकारी को महंगी पड़ी: रिश्वत लेते ग्राम सेवक गिरफ्तार

Web Summary : सेनगांव में एक ग्राम सेवक को ₹2,500 रिश्वत लेते हुए एसीबी ने रंगे हाथों पकड़ा। उन्होंने आवास योजना निरीक्षण रिपोर्ट पर हस्ताक्षर करने के लिए पैसे मांगे, जिससे लाभार्थी की स्वीकृति में देरी हुई। शिकायत के बाद गोरेगांव चौफुली पर जाल बिछाया गया।

Web Title : Bribery Costs Official Dearly: Village Officer Arrested Accepting Bribe

Web Summary : A village officer in Sengaon was caught red-handed by ACB accepting a ₹2,500 bribe. He demanded money for signing a housing scheme inspection report, delaying the beneficiary's approval. The trap was set at Goregaon Choufuli following a complaint.